Vande Bharat Express x
देश विदेश

Vande Bharat Express: वंदे भारत ट्रेनने ३ तरुणांना उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू; सेल्फी घ्यायला गेले अन्...

Gujarat News: गुजरातमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसने ३ तरुणांना धडक दिली. या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना राजकोट शहरात घडली. सेल्फी घेत असताना ही घटना घडली.

Priya More

Summary -

  • राजकोटमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसची ३ तरुणांना धडक

  • सेल्फी घेत असताना रेल्वे रूळावर गेल्याने अपघात झाला

  • दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला

  • तिघेही उत्तर प्रदेशचे असल्याची माहिती

गुजरातच्या राजकोटमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसने ३ तरुणांना धडक दिली. या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना राजकोट शहराजवळ सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. रेल्वे रूळाजवळ या तरुणांचा ग्रुप वंदे भारत एक्स्प्रेससोबत सेल्फी घेत होता. त्याचवेळी भरधाव आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसने त्यांना चिरडलं. हे तिन्ही तरुण मजूर असून उत्तर प्रदेशमध्ये राहणारे होते. गुजरातमध्ये कामानिमित्त आले होते. ट्रेनच्या धडकेत दोघांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. तर गंभीर जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये राहणारे ३ तरुण राजकोट येथील कारखान्यामध्ये मजूर म्हणून काम करत होते. सोमवारी पावणे पाचच्या सुमारास हे तरुण भक्तिनगर ते रिबदा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटकाजवळ गेले होते. त्याठिकाणावरून वेरावल - अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस जात होती. वंदे भारत एक्स्प्रेसला जाताना पाहून या तिन्ही तरुणांनी खिशातून आपआपला मोबाईल काढून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ते फाटक ओलांडून रेल्वे रूळावर गेले. पण त्याच वेळी अनर्थ घडला. भरधाव वंदे भारत एक्स्प्रेसने या तिन्ही तरुणांना धडक दिली. दोघे तर दूरवर फेकले गेले आणि त्यांच्या शरीराचे तुकडे झाले. तर तिसरा तरुण गंभीर जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही तरुण २० ते २९ वयोगटातील होते. सेल्फी काढत असताना ते रेल्वे रूळाजवळच उभे राहिल्यामुळे ट्रेनने त्यांना धडक दिली. या घटनेनंतर ट्रेन काहीकाळ थांबवण्यात आली. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघे जण गंभीर जखमी झाले होते. या दोन्ही तरुणांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण आणखी एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संदीप पटेल, संदीप कोळी अशी दोन्ही मृतांची नावं आहेत. तर कपिल पटेल हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेही राजकोटमधील कारखान्यात काम करत होते. संदीप पटेल हा गावी उत्तर प्रदेशकडे निघाला होता. त्याला सोडण्यासाठी इतर दोघे जण रेल्वे स्टेनशवर आले होते. रूळ ओलांडण्यापूर्वी त्यांनी रूळाजवळ ग्रुप सेल्फी घेण्याचा निर्णय घेतला आणि ही घटना घडली. तिन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह विधान, मनसे कार्यकर्त्यांनी तरुणाला अद्दल घडवली; पाहा VIDEO

Rajya Sabha: विनोद तावडे की धैर्यशील पाटील? राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ठरणार

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ

धक्कादायक! दूध पिऊन ४ जणांचा मृत्यू, १२ जण रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

Aditya Pancholi: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यावरील बलात्काराचा गुन्हा रद्द होणार? २ आठवड्यांनी कोर्टात होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT