Manasvi Choudhary
अंडी ही आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानली जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने अंडी खातात.
जिम व डाएट करणारे फिटनेस प्रेमी दररोज आहारात उकडलेल्या अंड्यांचा समावेश करतात.
परंतु, अनेकदा अंडी उकडताना त्यांचे कवच तडकते किंवा फुटते आणि आतील पांढरा भाग बाहेर येतो. अशा वेळी अंडी न फुटता परफेक्ट उकडण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.
अंडी उकडण्यासाठी थेट उकळत्या किंवा गरम पाण्यात टाकण्याऐवजी एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात अंडी ठेवा आणि मग गॅसवर शिजवायला सुरुवात करा.
भांड्यातील पाण्याला एकदा उकळी आली की गॅस कमी करा. मंद आचेवर अंडी शांतपणे आणि आतून व्यवस्थित शिजतात.
अंडी पूर्णपणे उकडल्यानंतर गॅस बंद करा आणि ती लगेच बर्फाच्या थंड पाण्यात काढून ठेवा. यामुळे अंडींचे कवच न तुटता सहज सोलता येते.