Accident News : महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला कंटेनरची जोरदार धडक; लोखंडी रॉड बसच्या आरपार घुसला अन्...

Nandurbar Accident News : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात भरधाव कंटेनरने प्रवाशांनी भरलेल्या उभ्या एसटी बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Accident News : महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला कंटेनरची जोरदार धडक; लोखंडी रॉड बसच्या आरपार घुसला अन्...
Nandurbar Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • कोंडाईबारी घाटात भरधाव कंटेनरने एसटी बसला दिली धडक

  • बस समोरच्या ट्रकवर आदळून दोन वाहनांत चिरडली गेली

  • लोखंडी रॉड थेट केबिनमध्ये घुसल्याने चालक अडकला

  • कोणतीही जीवित हानी नाही

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ असलेल्या नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. महामार्गावरील पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या एसटी बसला मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली.यावेळेस या बसमधून १५ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. या भीषण धडकेमुळे बस समोर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली आणि दोन अवजड वाहनांच्या मध्ये अक्षरशः चिरडली गेली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

हा अपघात इतका भयानक होता की, समोरच्या ट्रकचा 10 ते 12 फुटांचा लोखंडी रॉड अँगल.बसचे लोखंडी पत्रे फाडून थेट केबिनमध्ये घुसला. यामुळे बसच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला असून चालक महेंद्र लांजा गावित यांचा पाय केबिनमध्ये अडकून पडला होता. स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून चालकाला सुखरूप बाहेर काढले.

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला कंटेनरची जोरदार धडक; लोखंडी रॉड बसच्या आरपार घुसला अन्...
Pune Water Shortage : पुण्यात पाणीबाणी! पुढील १० दिवस शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत, कोणत्या भागावर होणार परिणाम? वाचा A टू Z माहिती

अपघाताची माहिती मिळताच जामनपाडा सरपंच प्रियंका गावित यांचे बंधू मनोहर गावित यांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी तातडीने आपल्या खासगी वाहनातून गंभीर जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर उपचार मिळू शकले.

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला कंटेनरची जोरदार धडक; लोखंडी रॉड बसच्या आरपार घुसला अन्...
Police Corruption News : गुन्हा माफ करतो सांगितलं, ४ लाखांची लाच घेतली; पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले, VIDEO पाहा

घटनास्थळी परिवहन विभागाचे निरीक्षक मुकेश देवरे दाखल झाले असून ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णत ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com