

बिहारच्या पाटणामध्ये पहाटे भीषण रस्ते अपघात झाला
भरधाव ट्रकने ऑटो रिक्षाला धडक दिली.
एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू
या अपघातामध्ये २ जण गंभीर जखमी झाले
देवदर्शनावरून परत येताना काळाचा घाला
बिहारच्या पाटणामध्ये भयंकर रस्ते अपघात झाला. बिहटा येथे प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ऑटो रिक्षाला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. हे सर्वजण भोजपुर जिल्ह्यातील आरा येथे राहणारे होते. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मणेर येथील मखदूम शाह याहिया यांच्या वार्षिक ऊर्सनिमित्त चादर अर्पण करण्यासाठी आरा गावातील ८ सर्वजण ऑटो रिक्षाने गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना त्यांच्या ऑटो रिक्षाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. रविवार पहाटे ३ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. बिहता येथील लेखन टोला येथे ही अपघाताची घटना घडली.
ऑटो रिक्षामध्ये असणाऱ्या ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले होते. या सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर उर्वरीत दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत. या अपघातानंतर मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
सकाळी सकाळी या अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. हा अपघात इतका भयंकर होता की ऑटो रिक्षाचा चक्काचूर झाला. मृतदेह ऑटो रिक्षामध्ये अडकले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांचे मृतदेह बाहरे काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.