Truck Accident: भीषण अपघात; शंभरच्या स्पीडनं धावणाऱ्या ट्रकच्या धडकेत २ रिक्षांचा चक्काचूर, ५ जणांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने दोन ऑटो रिक्षांना धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
Uttar Pradesh Accident:
Agra Accident: Five Die on the Spot After High-Speed Truck Collisionsaam tv
Published On
Summary
  • भरधाव ट्रकने दोन ऑटोरिक्षांना जोरदार धडक दिली.

  • या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • तीन जण गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने दोन ऑटोरिक्षांना जोरदार धडक दिली. ऑटोरिक्षातील पाच जणांचा मृत्यू झाला तर तीनजण गंभीर जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण जगन्नाथपुरीहून येत होते. हा अपघात उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडलाय. हाती आलेल्या माहितीनुसार,ट्रक १०० च्या स्पीडनं येत होता. धडक दिल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु उपस्थित असलेल्यांनी त्याला पकडत चोप दिला.

Uttar Pradesh Accident:
Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये कारने घेतला अचानक पेट

दरम्यान,अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतांची ओळख पटवली आणि त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आलीय. आग्रामधील खंडौली पोलीस स्टेशन परिसरातील जलेश्वर रोडवर हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, विजय सिंह उर्फ ​​बिजो गौतम, राधेश्याम गौतमचा मुलगा, लक्ष्मीचंद, भगवती प्रसादचा मुलगा, रघुवीर, जगन्नाथ प्रसादचा मुलगा, बिर्ला मिस्त्री, हातरस जिल्ह्यातील धाध्यू पोलीस ठाण्याच्या भदौ गावचे रहिवासी आहेत. आझम पाडा पोलीस स्टेशन शाहगंज, आग्रा येथील रहिवासी मुन्शी खानचा मुलगा शाहिदसह आठ मित्र २० जानेवारी रोजी जगन्नाथपुरीला गेले होते.

Uttar Pradesh Accident:
अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? नेमकी कारणं येणार समोर, ब्लॅक बॉक्स सापडला

दर्शनानंतर सर्वजण शनिवारी जबलपूरमार्गे आग्रा कॅन्ट रेल्वे स्टेशनवर पोहोचले. त्यांनी आपापल्या गावी परतण्यासाठी दोन ऑटो-रिक्षा बुक केल्या होत्या. त्यावेळी रामदत्त नावाचा एक प्रवाशी औषध खरेदी करण्यासाठी उतरला. त्याचदरम्यान नागला चंदन जलेश्वर रोडवर समोरून एक भरधाव ट्रक येत होता. या ट्रकने दोन्ही रिक्षांना धडक मारली. या धडकेत रिक्षांमधील प्रवाशांपैकी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. धनप्रसाद आणि विजय गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, येथे आणखी एकाचा मृत्यू झाला.

रिक्षांना धडक लागल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी स्थानिकांनी त्याला पकडलं आणि मारहाण केली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी गाठलं, आणि मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहीद खान असं एका रिक्षा चालकाचे नाव आहे. तर ट्रक चालकाने दारूचे सेवन केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com