अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? नेमकी कारणं येणार समोर, ब्लॅक बॉक्स सापडला

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघातस्थळी तपास सुरू आहे. घटनास्थळी ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर कारणांचा शोध वेगाने घेतला जातोय. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी एएआयबीने केंद्रीय चौकशी सुरू केली आहे.
Ajit Pawar Plane Crash:
AJIT PAWAR PLANE CRASH: BLACK BOX FOUND, AAIB STARTS INVESTIGATIONsaam tv
Published On
Summary
  • अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी आता केंद्रीय संस्थेकडून

  • AAIB ने अपघाताची अधिकृत चौकशी सुरू केली आहे.

  • अपघातस्थळी विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी आता केंद्रीय संस्थेकडून केली जाणार आहे. विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) या संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली आहे. त्याचा अहवाल आल्यानतंर तो अहवाल राज्य सरकारलाही पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अपघाताची चौकशी करावी, असे पत्र केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना लिहिलं होते. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून ही माहिती दिलीय.

Ajit Pawar Plane Crash:
Ajit Pawar Plane Crash:...तर असं काही घडलंच नसतं; २७ वर्षे अजितदादांसोबत असलेल्या ड्रायव्हरनं सांगितला तो अखेरचा संवाद

विमान अपघात तपास ब्युरो यांनी तपास सुरू केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार, तपास सुरू केला आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल. या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्डस, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जातोय.

भविष्यात अशा घटना होऊ नयेत, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली आहे. या चौकशी अहवाल येताच त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य मौल्यवान असेल, असं केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी मुंख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलंय.

Ajit Pawar Plane Crash:
Ajit Pawar Death: विमानात बिघाड की हवामान खराब, नेमकी गडबड कुठे झाली? अपघातानंतर विमान कंपनीच्या मालकाची प्रतिक्रिया आली समोर

कसा घडला अपघात?

अजित पवार मुंबईहून बारामतीला जात होते,त्यावेळी त्यांचे विमान लँडिंग करताना कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारल करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शाह, बीजेपी अध्यक्ष नितिन नवीन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. इतरही अनेक राजकीय नेते, मान्यवर नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या पथकाकडूनअपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅकबॉक्सचा शोध घेण्यात येत होता. विमानाचा तोच ब्लॅक बॉक्स आता सापडला आहे. विमान अपघाताचं कारण शोधण्यात हा ब्लॅक बॉक्स महत्वाचा ठरणार आहे. अखेरच्या क्षणी काय घडलं याची माहिती यातून मिळणार आहे.

अपघाताची काय कारणं असू शकतात?

'विमान अस्थिर असू शकतात'

वरिष्ठ वैमानिकाने सांगितले की, लँडिंग दरम्यान विमान पूर्णपणे स्थिर असणे आवश्यक असतं. लँडिंग करणं हा एक महत्त्वाचा टप्पा असतो, त्यावेळी विमानाची गती कमी होत ते खाली उतरत असते. यावेळी विमान पूर्ण फ्लॅप्स, स्लॅट्स आणि लँडिंग गियर वाढवून उडते. त्यामुळे वाऱ्यातील अचानक बदल किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास विमानाला अत्यंत असुरक्षित बनवत असते. प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार यांचे विमान धावपट्टीच्या जवळ कोसळल्याची माहिती हाती आली आहे.

विमानाचा वेग जास्त होता'

वरिष्ठ वैमानिकाने सांगितले की अजित पवारांच्या विमानाचा अप्रोच स्पीड सामान्यपेक्षा खूपच जास्त होता. त्यामुळे विमान अस्थिर झाले. पायलटने सांगितले की, जेव्हा विमान जमिनीपासून सुमारे ५०० फूट उंचीवर म्हणजेच धावपट्टीपासून सुमारे १.५ नॉटिकल मैल अंतरावर होते, तेव्हा त्याचा वेग १८३ नॉट्स इतका असावा अशी शक्यता एका वरिष्ठ पायलटनं वर्तवलीय.

त्यावेळी लिअरजेट सारख्या चार्टर्ड विमानाचा वेग १०६ ते १३५ नॉट्स दरम्यान असायला हवा होता. तसेच विमानाने लँडिंग सुरू ठेवण्याऐवजी पहिल्या घटनेप्रमाणे एक फेरी मारायला हवी होती, असे वरिष्ठ पायलटनं सांगितलंय.

ब्लॅक बॉक्स नेमका काय असतो, कुठे असतो?

ब्लॅक बॉक्स हे असे एक उपकरण असते जे विमानाच्या प्रत्येक हालचालीची नोंद करत असते. कोणत्याही विमान अपघातानंतर दुर्घटनेचं खरे कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स उपयोगी ठरत असते. लिअरजेट या विमानातही ब्लॅकबॉक्स होता. लेअरजेट ४५ हे विमान अत्यंत कडक सुरक्षा मानकांनुसार (FAR Part 25) बनवलंय. त्यात फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) दोन्ही आहेत.

त्यांना एकत्रितपणे “ब्लॅक बॉक्स” असं म्हटलं जातं. जरी त्याचं नाव ब्लॅक बॉक्स असलं तरी त्याचा रंग नारिंगी असतो. हा बॉक्स कोणत्याही ढिगाऱ्यात किंवा कचऱ्यात अथवा घनदाड जंगलात शोधणं सोपं व्हावं म्हणून याचा रंग असा नारिंगी असतो. कोणताही स्फोट, टक्कर, तीव्र आग, उच्च तापमान आणि पाणी यासारख्या कोणत्याही अपघातापासून वाचण्यासाठी ब्लॅक बॉक्सचे विशिष्ट पद्धतीने डिझाइन केलेलं असतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com