

अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
विमान अपघात प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू आहे.
अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झालाय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडून करण्यात येणार. अजित पवार यांच्यासह पाच जणांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुसरीकडे अजित पवारांचे चालक श्यामराव मनवे यांनी अपघाताबाबत मोठं विधान केलंय. जर अजित पवारांनी कारनं बारामतीला जाण्याचा विचार केला असता तर असा अनर्थ घडला नसता असं म्हटलंय.
अजित पवारांनी ती गोष्ट ऐकली असती तर कदाचित त्यांचा जीव आज वाचला असता असंही श्यामराव मनवे म्हणालेत. श्यामराव मनवे हे २७ अजित पवार यांची गाडी चालवत होते. जिथे अजित पवार तिथे श्यामराव असं जणू समिकरण जुळलं होतं. मनवे यांनी सरकारी नोकरी सोडून अजित पवार यांच्याकडे चालकाची नोकरी घेतली होती. ज्यावेळी अजित पवारांचा अपघात झाला त्यावेळी श्यामराव हे मुंबईत दादांच्या देवगिरी बंगल्यावर होते. दरम्यान अपघाताच्या आदल्या रात्री अजित पवार यांच्याशी त्यांचे बोलणं झालं होतं, याची माहिती मनवे यांनी साम टीव्हीशी बोलताना दिलीय
अजित पवार आणि आम्ही मंगळवारीच बाय रोडने जाणार होतोय. मंत्रिमंडळाची बैठकीनंतर निघणार होतो, मात्र एक दुसरी बैठक लागल्यानं तो प्लॅन रद्द झाला. बैठकीनंतर त्यांनी बाय रोड ऐवजी विमानाने बारामतीला जाण्याचं ठरवलं. जर अजितदादा बाय रोड आले असते तर हा अपघात घडला नसता.
पण अजितदादा म्हणाले की, त्यांनी मला सांगितलं की, मी विमानाने जातो, तू बाय रोडने पुण्याला ये. त्यानंतर मी बारामतीहून पुण्याला येतो असं अजितदादा म्हणाले. आपण त्यांना कारने पुण्याला रात्रीतच जावू असं सुचवलं होतं. पण त्यांना जाण्याच टाळलं. त्यांनी त्यावेळी माझं ऐकलं असतं तर अनर्थ घडलाच नसता, असं श्यामराव मनवे यांनी सांगितलं. हे सांगत असताना त्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. यावेळी श्यामराव मनवे यांनी अजित पवारांसोबतच्या आठवणीही सांगितल्या. अजितदादा हे कडक स्वभावाचे असले तरी तेवढेच मनाने चांगले होते. त्यांनी कधीही भेदभाव केला नसल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यू झालेल्या विमान अपघातासंदर्भात पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदवला आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या परिस्थितीचा तपास सध्या सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेची तपासणी करण्यासाठी आणि अपघाताचे कारण शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) पथके अपघातस्थळी दाखल झालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.