Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करा: संजय राऊत

Sanjay Raut Demands Ajit Pawar Plane Crash: खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सर्व तांत्रिक तपशील जनतेसमोर आले पाहिजेत असेही त्यांनी म्हटलंय.
Sanjay Raut Demands Ajit Pawar Plane Crash:
Ajit Pawar Plane CrashSaam Tv
Published On
Summary
  • अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करावी, संजय राऊत यांनी मागणी केली आहे.

  • तांत्रिक बिघाड असल्यास सर्व माहिती जनतेसमोर यावी, असेही संजय राऊत म्हणालेत.

  • शरद पवार यांनी हा अपघात असल्याचं म्हटलंय.

⁠तांत्रिक कारणांमुळे अपघात झाला असेल तर सर्व माहिती समोर आली पाहिजे. तांत्रिक चुका, विमानात बिघाड आणि विमानतळसंदर्भात चौकशी डीजीसीच्या माध्यमातून होत असते. अजित पवार यांचा अपघात हा महाराष्ट्र पचवू शकले नाही. दरम्यान अजित पवारांनी पहिल्यांदाच विमानाने प्रवास केला नाहीये, त्यामुळे शंका सर्वांना आल्या आहेत, त्यामुळे चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधीशीं बोलताना केली आहे.

Sanjay Raut Demands Ajit Pawar Plane Crash:
VSR Ventures: अपघातग्रस्त विमानाचे झाले होते दोन तुकडे, मग पुन्हा परवानगी कुणी दिली? कंपनीवर प्रश्नचिन्ह

अजित पवार यांच्या निधनाच्या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हळहळला आहे. आज सकाळी अजितदादा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय नेत्यांसह मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचदरम्यान आता अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जातेय. आज माध्यम प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊत यांनी अपघाताची चौकशी करण्यात यावी, सर्वांसमोर आली पाहिजे, असं म्हटलंय.

Sanjay Raut Demands Ajit Pawar Plane Crash:
Ajit Pawar Plane Crash: पायलटकडून MAYDAY कॉल गेलाच नाही? अपघातावेळी पायलट अन् ATC चं काय झालं बोलणं?

बारामतीच्या छोट्या विमानतळावर अजित पवार अनेक वेळा उतरले आहेत. कालच्या अपघातानंतर देखील अनेक विमान उतरली आहेत. अजित पवार यांचा अपघात हा महाराष्ट्र पचवू शकला नाहीये. ⁠अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर महाराष्ट्राची जनता पाहत आहे. यामुळे विमान अपघाताचं काय झालं याचा अहवाल समोर आला पाहिजे. तांत्रिक कारणांमुळे अपघात झाला असेल तर सर्व माहिती समोर आली पाहिजे. तांत्रिक चुका, विमानातील बिघाड, विमानतळ संदर्भातील चौकशी ही डीजीसीच्या माध्यमातून होत असते. असंही राऊत यावेळी म्हणाले.

आतापर्यंत झालेल्या चौकशीवर प्रश्न उपस्थित

दरम्यान विमान अपघाताच्या चौकशीची मागिणी करत असताना संजय राऊत यांनी चौकशीबाबतही प्रश्न उपस्थित केलेत. महाराष्ट्रात अनेक अपघातांच्या चौकश्या झाल्या आहेत, मात्र पुढे काय झालं, याचा कधी ही अहवाल देशासमोर आला नाहीये. ⁠माजी मंत्री किंवा आजपर्यंत विमान अपघात झालेल्या चौकश्यांचे काय झाले असा सवालही संजय राऊत यांनी केलाय. दरम्यान शरद पवार यांनी अपघाताचा खुलासा केलाय. अपघातच असून यात राजकारण करू नये, असं शरद पवार काल पत्रकारांशी बोलताना म्हणालेत. मात्र ⁠बारामतीच्या छोट्या विमानतळावर अजित पवार अनेकवेळा उतरले आहेत.⁠कालच्या अपघातानंतर देखील अनेक विमान उतरली आहेत. अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर महाराष्ट्राची जनता पाहत असून हा अपघात हा महाराष्ट्र पचवू शकला नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com