जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभर सभा घेत दिवस रात्र भ्रमण करीत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल बुधवारी निधन झाले. दादांच्या जण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला. या अपघातानंतर व्हीएसआर व्हेंचर्स या खासगी विमान कंपनीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे. गेल्या 3 वर्षात लिअरजेट 45 विमानाला अपघात होण्याची ही दुसरी मोठी घटना आहे.
14 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीचे विमान मुंबई विमानतळावर कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले होते. मात्र सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे 2023 मध्ये झालेल्या अपघाताचा अंतिम चौकशी अहवाल अजूनही आलेला नाही, तरीही कंपनीचे कामकाज सुरूच होते. 1998मध्ये आलेले हे विमान हानिवेल इंजिनानी सज्ज असते. मात्र याच मॉडेलच्या विमानाचे सलग दुसऱ्यांदा अपघात झाल्याने विमानांच्या सुरक्षितेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इतक्या त्रुटी असलेल्या या विमानाल उड्डाण करण्याची परवानगी कशी दिली? ती कोणाच्या मार्फत देण्यात आली? डीजीसीए काय करत होते? जुन्या आणि अपघातग्रस्त विमानाला पुन्हा फिटनेस सर्टिफिकेट देताना कोणत्या निकषांचा वापर झाला? ही कंपनी व्हीव्हीआयपीसाठी जुनी, जीर्ण झालेली विमाने वापरत आहे असा दावा केला जात आहे. कंपनीकडून याबाबत कोणताही प्रतिसाद येत नाहीये. अजितदादांच्या अपघाताची चौकशीची मागणी आता केली जात आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.