Sharad Pawar at Ajit Pawar Funeral : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व अजित पवार यांचे विमान अपघातात बुधवारी (२८ जानेवारी २०२६) अकाली निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. बारामतीमध्ये त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार आपल्या भावना रोखू शकले नाहीत. आयुष्यभर अनेक राजकीय वादळे अंगावर झेलणाऱ्या आणि वैयक्तिक धक्के पचवणाऱ्या शरद पवारांच्या डोळ्यात पुतण्याच्या जाण्याने अश्रू तरळले होते. हे दृश्य पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे मन हेलावून गेले.
अजित पवार हे केवळ पवार कुटुंबाचे सदस्य नव्हते, तर ते बारामतीकरांचे 'दादा' आणि आधारवड होते. त्यांच्या अंत्यविधीला जनसागराचा महापूर लोटला होता. ४० वर्षांचा संसार अर्धवट सोडून जाणाऱ्या पतीच्या जळत्या चितेकडे पाहून खासदार सुनेत्रा पवार हतबल झाल्या होत्या. पार्थ आणि जय पवार या दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांना साश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला. अजित पवार यांच्या बॉडीगार्डपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकजण धाय मोकलून रडताना दिसत होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.