Chief Minister Yogi Adityanath during a cabinet meeting amid buzz over major reshuffle Saam Tv
देश विदेश

राज्यात मोठी खळबळ! तब्बल 70 टक्क्यांहून अधिक मंत्र्यांची खुर्ची जाणार ? या आमदारांना संधी मिळण्याची शक्यता

70 Percent Ministers To Be Replaced In Up: उत्तर प्रदेशात योगी सरकारकडून मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता असून 70 टक्क्यांहून अधिक मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? वाचा सविस्तर.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेश सरकारमध्ये लवकरच मोठ्या स्तरावर मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी गुजरातमध्ये ज्याप्रमाणे संपूर्ण मंत्रिमंडळ बदलून नवीन चेहरे आणले होते, त्याच धर्तीवर उत्तर प्रदेशातही मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, योगी सरकारमधील ७० टक्क्यांहून अधिक मंत्री बदलले जाऊ शकतात.

जुण्या चेहऱ्यांना डच्चू, नव्यांना संधी

या फेरबदलाचा सर्वाधिक फटका अशा नेत्यांना बसू शकतो जे २०१७ आणि २०२२ अशा दोन्ही कार्यकाळात मंत्री राहिले आहेत. गेल्या ८-९ वर्षांपासून सत्तेत असलेल्या मंत्र्यांपैकी केवळ काही मोजके अपवाद वगळता इतरांना डच्चू दिला जाऊ शकतो.

कुर्मी समाजावर लक्ष

पंकज चौधरी यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवल्यानंतरही मंत्रिमंडळात कुर्मी समाजाचे वर्चस्व कायम राहू शकते. या समाजातील आणखी २-३ नवीन नेत्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

मकर संक्रांतीनंतर निर्णय

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली आहे. मकर संक्रांतीनंतर कोणत्याही दिवशी या नवीन मंत्रिमंडळाची घोषणा होऊ शकते.

या नेत्यांची लागू शकते वर्णी (संभाव्य नावे)

आकाश सक्सेना (रामपूर)

कुंवर जयवीर सिंह (अलिगड)

पंकज सिंह (संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र)

साध्वी निरंजन ज्योती

भूपेंद्र सिंह चौधरी

महेंद्र सिंह (पुनरागमन होण्याची शक्यता)

याशिवाय पूजा पाल, मनोज पांडेय, कृष्णा पासवान, राम रतन कुशवाहा, पद्मसेन चौधरी आणि अशोक कटारिया यांच्या नावांचीही चर्चा आहे.

सध्याच्या मंत्रिमंडळाची स्थिती

योगी सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह एकूण ५४ मंत्री आहेत. यात २१ कॅबिनेट मंत्री, १४ राज्यमंत्री आणि १९ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

पक्षात आणि सरकारमध्ये अदलाबदल

भाजपच्या या रणनीतीनुसार, सरकारमधील काही मंत्र्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, तर पक्षात सक्रिय असलेल्या चेहऱ्यांना सरकारमध्ये आणले जाईल. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मोठा फेरबदल मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goa Tourism : फुल टू धमाल! 'गोव्यातील' Hidden पिकनिक स्पॉट, वीकेंड होईल खास

Maharashtra Live News Update : बुलढाण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडरवर आदळली

मुलाच्या अंगात राक्षस शिरला, आई अन् बायकोला दगडानं ठेचलं, मांस खाल्ला; हैवानी कृत्य बघून अख्खं गाव हादरलं

महापालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस, अपक्ष उमेदवाराने पकडली २० लाखांची रोकड, राजकारण खळबळ|VIDEO

Amruta Deshmukh: साडीत उंदीर,घाणेरडं वॉशरुम; पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या दयनीय अवस्थेवर मराठी अभिनेत्री संतापली

SCROLL FOR NEXT