youth inserts water bottle in rectum Saam Tv
देश विदेश

Shocking: लैंगिक विकृतीतून तरुणाने गुदाशयात घुसवली पाण्याची बाटली, ३६ तास असह्य वेदना, १ तासाच्या शस्त्रक्रियेनंतर वाचले प्राण

youth inserts water bottle in rectum: उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाने आपल्या गुदाशयामध्ये बॉटल घुसवली. लैंगिक विकृतीतून या तरुणाने हे भयंकर कृत्य केले. ३६ तास त्याच्या गुदाशयातच ही बॉटल होती. शेवटी १ तासाच्या शस्त्रक्रियेनंतर ही बॉटल बाहेर काढण्यात आली.

Priya More

Summary:

  • उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने भयंकर कृत्य केले

  • गुदाशयात तरुणाने बॉटल घुसवली

  • ३६ तास बॉटल या तरुणाच्या गुदाशयातच होती

  • १ तासाच्या शस्त्रक्रियेनंतर ही बॉटल बाहेर काढण्यात आली

उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये एक चक्रावून टाकणारी घटना घडली. एका तरुणाने लैंगिक विकृतीतून पाण्याची बॉटल गुदाशयात घुसवली. ही बॉटल त्याच्या गुदाशयात अडकली. प्रकृती बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल १ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ही पाण्याची बॉटल बाहेर काढण्यात आली. चार दिवस या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या कृतीमुळे तरुणाच्या मलाशयाला गंभीर जखमा झाल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील आग्रा येथील साकेत कॉलनी येथील नवदीप रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे एका तरुणाच्या गुदाशयातून एक लिटरची प्लास्टिकची बाटली काढण्यात आली. मंगळवारी हा ३८ वर्षांचा तरुण तरुणालयात दाखल झाला होता. ज्यावेळी एक्सरे काढण्यात आले तेव्हा त्याच्या मलाशयामध्ये १ लीटरची पाण्याची बाटली अडकल्याचे दिसून आले. यामुळे तरुणाला प्रचंड वेदना होत होत्या.

गेल्या ३६ तासांपासून ही पाण्याची बाटली तरुणाच्या गुदाशयात अडकली होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तरुणावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रियेदरम्यान बॉटल काढताना तरुणाचे मलाशय फाटण्याची किंवा त्याला दुखापत होण्याची शक्यता होता. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तरुणाने सुटकेचा निश्वास सोडला. पूर्णपणे बरा झाल्यानंतर तरुणाला घरी सोडण्यात आले.

शस्त्रक्रिया करणारे डॉ. सुनील शर्मा यांनी सांगितले की, तरुणाने गुदद्वारातून एक लिटर पाण्याची बाटली आत घातली. ही बाटली त्याच्या गुदाशयात अडकली. त्याला असह्य वेदना होत होत्या आणि त्याची प्रकृती गंभीर झाल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाटली ३६ तासांपासून त्याच्या गुदायशयात अडकली होती. एक्स-रे नंतर एका विशेष टीमने सुमारे सव्वा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर बाटली बाहेर काढली. जखम बरी झाल्यानंतर आणि आतड्यांसंबंधी कोणतीही समस्या न आल्यानंतर रुग्णाला घरी सोडण्यात आले.

मानसिक आरोग्य संस्था आणि रुग्णालयाचे संचालक डॉ. दिनेश राठोड यांनी सांगितले की,गुदद्वारासंबंधी लैंगिक कामुकता असलेल्या लोकांना एचआयव्ही, हेपेटायटीस बी आणि इतर लैंगिक संक्रमित आजारांचा धोका असतो. त्यांनी तज्ज्ञांसोबत सल्लामसलत करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT