Bike Maintenance: बाइक रोज चालवणं चांगलं की आठवड्यातून काही दिवस बंद ठेवणं?

Surabhi Jayashree Jagdish

रोज बाईक चालवण्याचे फायदे

जर तुम्ही रोज बाईक चालवत असाल तर इंजिन सुरु राहतं. त्यामुळे त्यातील ऑईल सर्व भागांपर्यंत पोहोचतं. त्याचप्रमाणे बाईक चालवल्याने बॅटरी चार्ज राहण्यासही मदत होते. नियमित वापरामुळे बाइकच्या इंजिनचा आवाज, स्टार्टिंग किंवा चालवताना जाणवणारे बदल लवकर लक्षात येतात.

Bike Storage Tips | saam tv

बाइक अनेक दिवस बंद ठेवल्यास इंजिनवर परिणाम

बाइक अनेक दिवस बंद ठेवल्यास इंजिनमधील ऑइल खाली साचतं. पण इंजिन सुरू केल्यावर ते पुन्हा सर्व भागांमध्ये पसरते. बाइक दीर्घकाळ वापरली नाही तर पेट्रोल जुनं होऊ शकतं आणि काही परिस्थितीत बाइक सुरू होण्यास त्रास होऊ शकतो. बाइक बराच काळ उभी राहिल्यास इंजिन सुरू करताना सुरुवातीला थोडा जास्त वेळ लागू शकतो.

Bike Engine Oil | saam tv

पेट्रोलचा खर्च आणि मायलेजवर परिणाम

बाइक रोज चालवल्याने पेट्रोलचा खर्च वाढतो. याचं कारण म्हणजे कारण वापरानुसार पेट्रोल खर्च होत असतं. बाइक वारंवार थोड्या अंतरासाठी चालवल्यास इंजिन पूर्ण गरम होण्याआधी बंद होऊ शकतं. त्यामुळे इंधनाचा वापर तुलनेने जास्त होऊ शकतो. योग्य वेगाने बाइक चालवणं, वेळेवर सर्व्हिसिंग करणं आणि टायरमध्ये योग्य हवा ठेवणं यामुळे चांगलं मायलेज मिळण्यास मदत होते.

Bike Chain Lubrication | saam tv

टायर आणि ब्रेकसाठी काय योग्य?

बाइक नियमित चालवल्याने टायर फिरत राहतात आणि एकाच जागेवर सतत भार पडत नाही. बाइक अनेक दिवस एकाच जागी उभी राहिल्यास टायरमधील हवा कमी होऊ शकते आणि एकाच भागावर भार पडत राहतो. ब्रेक नियमित वापरल्याने त्यांची कार्यक्षमता चांगली राहण्यास मदत होते.

Bike Tyre Pressure | saam tv

बॅटरी डाऊन होण्याची शक्यता

बाइक बंद असतानाही बॅटरीमधील चार्ज हळूहळू कमी होत असतो. बाइक अनेक दिवस किंवा आठवडे न वापरल्यास बॅटरीचा चार्ज कमी होऊन बाइक सुरू होण्यास अडचण येऊ शकते. बॅटरी जुनी असेल किंवा तिची क्षमता कमी झाली असेल तर बाइक कमी दिवस बंद ठेवल्यानंतरही ती डाऊन होण्याची शक्यता असते.

Daily Motorcycle Use | saam tv

बाइक वापरात नसताना कोणती काळजी घ्यावी?

बाइक जास्त दिवस वापरणार नसाल, तर ती कोरड्या आणि सुरक्षित जागी पार्क करावी. बाइकचे टायर योग्य हवेत ठेवावेत आणि चेनला वेळोवेळी ल्युब्रिकेशन करावं. बाइक जास्त दिवस बंद ठेवणार असल्यास बॅटरीची स्थिती तपासावी आणि गरजेनुसार चार्जिंगची व्यवस्था करावी.

Bike Care Tips | saam tv

बाइक रोज चालवणं की आठवड्यातून काही दिवस चालवणं?

बाइक रोज चालवणं बॅटरी, इंजिन आणि इतर भागांच्या नियमित वापरासाठी फायदेशीर ठरू शकतं. आठवड्यातून काही दिवस बाइक चालवली तरी हरकत नाही, मात्र ती अनेक आठवडे किंवा महिने सतत बंद ठेवणं टाळावं.

How Often Should You Ride a Bike | saam tv

Bike chain maintenance: बाईकची चेन किती दिवसांनी ल्युब्रिकेट करावी?

Bike chain maintenance | saa tv
येथे क्लिक करा