Shocking : संतापजनक! ८९ वर्षाच्या महिलेला रूग्णालयात उंदराने कुरतडले, ICU मधील भयावह घटना

Mira Bhayandar Hospital News : मिरा भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या ८९ वर्षीय महिलेला उंदराने कुरतडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिरा भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या 89 वर्षीय महिलेला रात्री उंदराने हाताला कुरतडण्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

सुहासिनी माठेकर असं 89 वर्षाच्या महिला रूग्णाचे नाव आहे. 12 मार्च रोजी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवले. रुग्णालयाचा एव्हढा हलगर्जीपणा आहे की आयसीयूसारख्या विभागात सामान्य माणसांना प्रवेश नाही, मात्र उदरांनी उच्छाद मांडला आहे.

सकाळी 6 वाजता घरचे नातेवाईक त्यांना बघायला गेले असता हात कुरतडनारा उंदीर पळून गेला. मात्र कर्त्यव्यावरील डॉक्टर किंवा नर्सेस यांनी रात्री बघितले नाही. सकाळी घरचे लोक गेले तेंव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com