Summary -
उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात लग्नाच्या फोटोसेशनदरम्यान स्टेज अचानक कोसळला
नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण खाली पडले
सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही
या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून व्हायरल होत आहे
उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील एका लग्नसमारंभात भयंकर घटना घडली. लग्नसोहळा पार पडल्यानंतर फोटोसेशन सुरू असताना अचानक स्टेज कोसळला आणि एकच गोंधळ उडाला. नवरी-नवरा, भाजप नेत्यासह १० जण खाली पडले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बलियामध्ये भाजप कार्यकर्त्याच्या भावाचे लग्न झाले. या लग्नानंतर पाहुण्यांसाठी रिसेप्शन ठेवले होते. यावेळी मोठ्या संख्येने पाहुण्यांनी उपस्थिती लावली. नवरा-नवरीसोबत फोटो काढण्यासाठी सर्वांनी स्टेजवर गर्दी केली होती. तेवढ्यात स्टेजचा काही भाग कोसळतो आणि नवरा नवरीसह काही जण खाली पडतात. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नवरा-नवरीला आशीर्वाद देण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी पाहुण्यांनी स्टेजवर गर्दी केली आहे. भाजपेचे जिल्हाध्यक्ष संजय मिश्रा, पक्षाचे माजी खासदार आणि इतर काही नेते स्टेजवर नवरा-नवरीसोबत फोटो काढण्यासाठी उभे राहतात. नवरा-नवरी खुर्चीवर बसलेत तर इतर सर्वजण त्यांच्या खुर्चीच्या बाजूला उभे राहिले आहेत. क्षणात स्टेज कोसळतो आणि सर्वजण खाली पडतात. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
भाजप जिल्हाध्यक्ष संजय मिश्रा यांनी सांगितले की, पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या कुटुंबाने लग्नाला बोलावले होते. आम्ही सर्वजण वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर गेलो. अचानक कोसळला आणि आम्ही सर्वजण पडलो. देवाचे आभार कोणीही गंभीर जखमी झाले नाही.'
या घटनेनंतर रिसेप्शन काही वेळासाठी थांबवण्यात आले. त्यानंतर हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी स्टेजची क्षमता योग्यरित्या तपासली नव्हती त्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. या घटनेत सर्व नेते आणि नवरा-नवरी सुरक्षित आहेत आणि सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.