सनम बेवफा! नवरा बाथरूममध्ये गेला, बायकोचं बॉयफ्रेंडसोबत गुलुगुलु; पतीनं गळा दाबून संपवलं, लिपस्टिकनं भिंतीवर..

Husband Catches Wife Talking to Lover: छत्तीसगढच्या बिलासपूरमध्ये दुहेरी हत्याकांड. पतीनं पत्नीला बॉयफ्रेंडसोबत बोलताना रंगेहाथ पकडलं. पतीकडून पत्नीची हत्या.
Husband Catches Wife Talking to Lover
Husband Catches Wife Talking to LoverSaam Tv Marathi
Published On

छत्तीसगढच्या बिलासपूरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पती बाथरूममध्ये गेल्यानंतर पत्नीनं प्रियकरासोबत बोलण्याची संधी साधली. पती मात्र, पत्नीचं बोलणं ऐकत होता. पती बाथरूममधून बाहेर आला. तसेच संतापून पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्यानं खोलीच्या भिंतीवर लिपस्टिकने एक चिठ्ठी लिहिली. तसेच आत्महत्या करून आयुष्य संपवलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव नेहा उर्फ शिवानी तांबे असल्याची माहिती आहे. १० वर्षांपूर्वी त्यानं राज तांबेसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. या जोडप्याला ३ अपत्य आहेत. मात्र, कालांतराने नात्यात दुरावा येऊ लागला. दोघांमध्ये सतत भांडणं होत. दरम्यान, शिवानी तांबे दुसऱ्या पुरूषाशी जवळीक साधली. शिवानी परपुरूषासोबत अनैतिक संबंधात अडकली.

Husband Catches Wife Talking to Lover
'आयुष्यात पोकळी..' धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींची भावनिक पोस्ट, मन केले मोकळे

राज तांबेला हे कळताच तो संतापला. त्यानं रागाच्या भरात पत्नीचा गळा दाबून खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर त्यानं खोलीच्या भिंतीवर लिपस्टिकने एक चिठ्ठी लिहिली. चिठ्ठीत त्यानं पत्नीच्या हत्येचं कारण स्पष्ट केलं. लिपस्टिकने त्यानं भिंतीवर राजेश विश्वासचं नाव आणि मोबाईल नंबर लिहिला. त्यानं असेही लिहिले की त्याची पत्नी फोनवर बोलताना पकडली गेली.

Husband Catches Wife Talking to Lover
मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी राज्य सरकारचा पुढाकार; तब्बल ५०० कोटींचं निधी मंजूर, प्रवाशांची चिंता मिटणार

या प्रकरणात पोलिसांना एक पानी सुसाईड नोट सापडली. नंतर त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानं सुसाईड नोटमध्ये त्याच्या मृत्यूसाठी राजेश विश्वासला जबाबदार ठरवले. यानंतर मृत महिलेची आई घरी गेली. तेव्हा मुलगी आणि जावयाचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. यानंतर त्यानं पोलीस ठाणे गाठले. तसेच त्यांना या घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच सरकंडा पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचले. या तपासात राजेशने आधी पत्नीचा गळा दाबून खून नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com