मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी राज्य सरकारचा पुढाकार; तब्बल ५०० कोटींचं निधी मंजूर, प्रवाशांची चिंता मिटणार

Mumbai Metro Development Speeds Up: महाराष्ट्र शासनाने MMRDAच्या ९ मेट्रो प्रकल्पांसाठी ४९८ कोटींहून अधिक रकमेचे बिनव्याजी कर्ज मंजूर केले आहे.
Metro
Metro Saam tv
Published On
Summary
  • MMRDAच्या ९ मेट्रो प्रकल्पांसाठी राज्य शासनाने तब्बल ५०० कोटींचे बिनव्याजी कर्ज मंजूर केलंय

  • ठाणे कल्याण भिवंडी मेट्रो लाईन ५ साठी महत्वपूर्ण निधी वितरित करण्यात आला

  • मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा वेगाने उभारण्यावर भर

मुंबई महानगर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगर विकास विभागाने दहिसरपासून मीरा रोड, ठाणे तसेच कल्याणपर्यंतच्या विविध मार्गांवरील नऊ मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीसाठी एकूण ४९८ कोटी ७४ लाख ९० हजार रूपयांच्या बिनव्याजी दुय्यम कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला या नऊ प्रकल्पांच्या उभारणीसाठी राज्य सरकारनं ५०० कोटी रूपयांचे बिनव्याजी कर्ज वितरित केलंय. प्रत्येक प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

Metro
'शौक बड़ी चीज है'; चक्क १.१७ कोटींची नंबर प्लेट, VIP आकडा पाहून व्हाल थक्क

मुंबई मेट्रो लाईन ५ म्हणजे ठाणे - कल्याण - भिवंडी या महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलीय. या प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा ५० टक्के कर, १०० टक्के स्थानिक कर आणि जमिनीच्या खर्चासाठी एकूण १,३५२ कोटी २५ लाख रूपये दुय्यम कर्जाच्या स्वरूपात राज्य सरकारकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत देण्याचा निर्णय घेतला आहे. हे दुय्यम कर्ज टप्प्याटप्प्याने MMRDAकडून परतफेड करण्यात येणार आहे.

Metro
राम मंदिरावर भगवा फडकला! अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वाजारोहण, VIDEO समोर

मुंबई मेट्रो लाईन ५ प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून राज्याच्या नगर विकास विभागाने ५२ कोटी ३८ लाख ६० हजार रूपये दुय्यम कर्जाच्या रूपात वितरित करण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रो ६ म्हणजेच स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी विक्रोळी या मेट्रोसाठी ३२ कोटी ९५ लाख २० हजार रूपये वितरित केले आहेत.

मेट्रो मार्ग २ अ दहिसर पूर्व ते डीएन नगर प्रकल्पासाठी २८ कोटी ८९ लाख ७० हजार वितरित करण्यात आले आहेत. तसेच मुंबई मेट्रो २ ब डीएन नगर ते मंडाले प्रकल्पासाठी ११२ कोटी ८० लाख रूपये वितरित करण्यात आले आहे. मुंबई मेट्रो मार्ग ४ वडाळा घाटकोपर मुलुंड कासारवडवली आणि मुंबई मेट्रो ४ अ कासारवडवली ते गायमुख प्रकल्पासाठी ९८ कोटी ७२ लाख ८० हजार रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई मेट्रो ७ अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व प्रकल्पासाठी ४९ कोटी ६३ लाख २० हजार रूपये वितरित करण्यात आले आहे. तसेच गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड प्रकल्पासाठी ८६ कोटी १४ लाख ४० हजार रुपये वितरित करण्यात आले आहे. मुंबई मेट्रो मार्ग १२ कल्याण ते तळोजा प्रकल्पासाठी एक कोटी ८ लाख ९० हजार रुपये निधी वितरित करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबई मेट्रो ९ दहिसर ते मीरा रोड आणि मार्ग ७ अ अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी ६६ कोटी ७१ लाख ४० हजार वितरित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com