दारू पिण्यासाठी पैसे न मिळाल्याने एका नवऱ्याने बायकोला अर्धनग्न करून शेतातच बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत तिचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेचा मृतदेह रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून महिलेला मृत घोषित केले आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये घडली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही घटना रामपूर पोलीस स्टेशन परिसरातील कोटीगाव येथील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम बच्चनला दारू पिण्याचे व्यसन आहे. तो दारू पिऊन पत्नीला नेहमी मारझोड करी. बुधवारी सकाळी त्याची पत्नी घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या जितापूर गावात गहू कापणीसाठी गेली होती.
सकाळी १०:३० च्या सुमारास, तिचा पती बच्चन शेतावर पोहोचला आणि त्याने पत्नी मंजूकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मंजू म्हणाली की तिच्याकडे पैसे नाहीत आणि ती घरी जाऊन त्याला देईल.
यानंतर, पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि शेतातच अर्धनग्न केलं. पत्नीला अर्धनग्न करून पतीने तिला विटेने मारले. या मारहाणीत तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवले. तसेच मद्यधुंद पतीला अटक केली आहे. त्या महिलेला ७ वर्षांची मुलगी अलका आणि ५ वर्षांचा मुलगा निखिल आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.