Shruti Vilas Kadam
अॅसिडिटी जाणवत असल्यास थोडे-थोडे कोमट पाणी प्या. यामुळे काही लोकांना पोट हलके वाटू शकते आणि जळजळ कमी होण्यास मदत होऊ शकते.
जेवणानंतर अर्धा ते एक चमचा बडीशेप चावून खाल्ल्यास पचनास मदत होऊ शकते. काही लोकांमध्ये अॅसिडिटीची लक्षणे कमी जाणवू शकतात.
काही लोकांना साधे, साखर नसलेले थंड दूध तात्पुरता आराम देऊ शकते. दूधामध्ये गुळ टाकून प्यायल्याने आणखी फायदा होतो. मात्र सर्वांनाच ते फायदेशीर ठरेल असे नाही.
तुळशीची ४-५ पानं खल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास लवकर कमी होतो. सकाळी रिकाम्यापोटी किंवा रात्री झोपताना तुळशी पत्र खल्ल्याने पोटाला आराम मिळतो.
जेवणानंतर ३० मिनिटांनंतर जीर आणि काळी मीठ पाणी प्यायल्याने डायजेशन सुधारते. तसेच अॅसिडिटी कमी होण्यास मदत होते.
वारंवार अॅसिडिटी होत असल्यास तिखट, तळलेले, जास्त तेलकट तसेच जंक फूड कमी खा. यामुळे त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
जेवणानंतर किमान २ ते ३ तासांनी झोपा. लगेच आडवे झाल्यास आम्ल वर येऊन अॅसिडिटी वाढू शकते.