Shruti Vilas Kadam
बर्फाचा तुकडा थेट त्वचेवर न घासता तो स्वच्छ सूती कापडात किंवा मलमलच्या कपड्यात गुंडाळा. नंतर हलक्या हाताने ३० सेकंद ते १ मिनिट चेहऱ्यावर फिरवा. एका जागी जास्त वेळ ठेवू नका.
सकाळी चेहऱ्यावर बर्फ फिरवल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा अधिक तजेलदार, फ्रेश आणि नैसर्गिक चमकदार दिसते.
झोपेतून उठल्यानंतर डोळ्यांभोवती किंवा चेहऱ्यावर आलेली सूज कमी करण्यासाठी बर्फ उपयुक्त ठरू शकतो. चेहरा अधिक फ्रेश दिसतो.
बर्फामुळे त्वचेवरील पोर्स काही काळासाठी आकुंचन पावल्यासारखे दिसू शकतात. त्यामुळे त्वचा अधिक स्मूथ आणि स्वच्छ वाटते.
मेकअप करण्यापूर्वी एक मिनिट बर्फ लावल्यास त्वचा गार आणि ताजी वाटते. त्यामुळे मेकअप अधिक स्मूथ दिसण्यास मदत होऊ शकते.
सकाळी बर्फाचा थंडावा चेहऱ्याला ताजेतवाने वाटण्यास मदत करतो. त्यामुळे झोपेची गुंगी कमी होऊन फ्रेश फील येतो.
अतिसंवेदनशील त्वचा, रोझेशिया, एक्झिमा किंवा थंडीची अॅलर्जी असल्यास बर्फ लावण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्वचेवर जखम किंवा संसर्ग असल्यास बर्फ लावणे टाळा.