Surabhi Jayashree Jagdish
तुमच्या खिशात असलेली ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी हे ओळखणं आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचं झालं आहे. खोट्या नोटांमुळे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने ५०० रुपयांची अस्सल नोट ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत.
५०० रुपयांची नोट डोळ्यांसमोर सुमारे ४५ अंशांच्या कोनात सरळ धरावी. नोटेच्या उजव्या बाजूच्या फुलाच्या चिन्हाजवळील बॉक्समध्ये तिरपा पाहिल्यावर '500' हा आकडा दिसतो. हा लॅटेंट इमेज प्रभाव खऱ्या नोटेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं.
नोट प्रकाशाकडे धरल्यास डाव्या बाजूच्या रिकाम्या जागेत '500' हा आकडा स्पष्ट दिसतो. नोटेच्या पुढील आणि मागील बाजूवरील छपाई एकमेकांशी अचूक जुळते.
नोटेच्या मध्यभागी असलेला सुरक्षा धागा तिरका केल्यावर त्याचा रंग बदलताना दिसतो. सरळ पाहिल्यास हा धागा हिरव्या रंगाचा दिसतो तर तिरका केल्यावर तो निळ्या रंगाचा दिसतो. हा रंगबदल खऱ्या नोटेतील महत्त्वाचा सुरक्षा संकेत आहे.
नोटेच्या खालच्या उजव्या बाजूला छापलेला '500' हा आकडा सरळ पाहिल्यास हिरवा दिसतो. नोट तिरकी केल्यावर त्याच आकड्याचा रंग निळा होतो. या रंगबदलामुळे नोट खरी आहे का हे तपासण्यास मदत होते.
नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधी यांचे चित्र उभ्या छपाईत (Intaglio Printing) तयार केलेलं असतं. हे चित्र बोटांनी स्पर्श केल्यास उंचवट्यासारखे जाणवतं. बनावट नोटांमध्ये हा उठाव अनेकदा स्पष्टपणे जाणवत नाही.
महात्मा गांधींच्या चित्राजवळ अशोक स्तंभाचं चिन्हही उभ्या छपाईत असतं. या चिन्हावर हात फिरवल्यास त्याचा उठाव सहज जाणवतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.