Uttar Pradesh Crime  Saam Tv
देश विदेश

Shocking: महिला IAS अधिकाऱ्याच्या घरी सेक्स रॅकेट, पोलिसांनी ८ तरुण-तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी ८ तरुण-तरुणींना पोलिसांनी आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. पोलिसांनी ९ जणांना अटक केली असून ते तपास करत आहेत.

Priya More

Summary -

  • प्रयागराजमध्ये महिला IAS अधिकाऱ्याच्या घरावर पोलिसांचा छापा

  • ४ तरुणी आणि ४ तरुणांना आक्षेपार्ह स्थितीत पकडले

  • सेक्स रॅकेटचा सूत्रधार सर्वेश दुबेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • या सेक्ट रॅकेटचा पोलिस तपास करत आहेत

उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. प्रयागराजमधील आयएएस अधिकाऱ्याच्या घरावर पोलिसांनी रात्री छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांना घरातील खोलीमध्ये काही तरुण- तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली. आयएएस अधिकाऱ्याच्या घरी सेक्स रॅकेट सुरू असल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये या घटनेची चर्चा होत आहे. पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराजमधील दाट लोकवस्ती असलेल्या किडगंज परिसरात ही कारवाई करण्यात आली. याठिकाणी महिला आयएएस अधिकाऱ्याचे घर आहे. हे घर त्यांनी १५००० रुपयांवर भाड्याने दिले होते. या घरामध्ये रात्रीच्या वेळी तरुण-तरुणींच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आयएएस अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला. यावेळी ४ तरुणी आणि ४ तरुण पोलिसांना आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले. पोलिसांनी या प्रकरणी ९ जणांना अटक केली.

आयएएस अधिकाऱ्याचे घर १५००० रुपये महिना असे भाड्यावर दिले होते. कुटुंबासोबत राहण्याचा करार झाला होता. सुरूवातीला सर्वकाही सामान्य होते. पण नंतर रात्रीच्या वेळी या घरात तरुण-तरुणींचा वावर वाढू लागला. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी तरुण-तरुणी येत होते. यामुळे शेजारी राहणाऱ्यांना संशय आला. त्यांनी याबाबत पोलिसांना तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्याठिकाणी काही खोल्यांमध्ये तरुण-तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्या. या सर्वांवर लक्ष ठेवणाऱ्या मास्टरमाइंडला पोलिसांनी घराबाहेरून अटक केली.

या खोल्यांमधून काही संशयास्पद आणि आक्षेपार्ह वस्तू देखील पोलिसांनी जप्त केल्या. ज्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या कारवाईदरम्यान घराबाहेर उभा असलेला एक माणूस पोलिसांना संशयास्पद वाटला. चौकशीदरम्यान त्याचे नाव सर्वेश दुबे असल्याचे आढळून आले. जो या सेक्स रॅकेटच्या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी सर्वेशसह ९ जणांना अटक केली. या सेक्स रॅकेटमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. चांगली लोकवस्तीच्या ठिकाणी असे घाणेरडे धंदे सुरू असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT