Shocking: भाजप महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेट, ९ तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये सेक्स रॅकेटचा पदर्फाश करण्यात आला आहे. भाजप महिला नेत्याच्या फ्लॅटवर हे सेक्स रॅकेट सुरू होते. पोलिसांनी ९ तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडले.
Shocking: भाजप महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेट, ९ तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं
Saam Tv
Published On

उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. स्पा सेंटरच्या नावाखाली भाजपच्या महिला नेत्याच्या फ्लॅटवर वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी या फ्लॅटवर धाड टाकत ९ तरुणींना आणि ४ तरुणांना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. घटनास्थळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह वस्तू देखील सापडल्या. हा फ्लॅट भाजपच्या महिला नेत्या शालिनी यादव यांच्या नवऱ्याच्या नावावर नोंदणीकृत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. शहरातील एका अपार्टमेंटमध्ये बऱ्याच काळापासून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा सुरू आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यासोबतच शहरातील इतर अनेक ठिकाणांची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने घटनास्थळी छापा टाकला. त्यांना आक्षेपार्ह स्थितीत ९ तरुणी आणि ४ तरुण आढळून आले. पोलिस पथकाला फ्लॅटमधून आक्षेपार्ह वस्तू, रजिस्टर, मोबाईल नंबर आढळले. त्यांची चौकशी सुरू आहे.

Shocking: भाजप महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेट, ९ तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं
Shocking : भयानक! गर्लफ्रेंडची हत्या करणाऱ्या बॉयफ्रेंडचाही मृत्यू, पोलिसांसमोरच आला हार्ट अटॅक

ज्या फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकला तो फ्लॅट शालिनी यादव यांचे पती अरुण यादव यांच्या नावावर आहे. शालिनी यादव यांनी २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर महापौरपदाची निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ मध्ये त्या समाजवादी पक्षात सहभागी झाल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सपाच्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांना जवळजवळ २,००,००० मते मिळाली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर आल्या.

Shocking: भाजप महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेट, ९ तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं
Shocking : मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत ९ वर्षाच्या मुलासोबत अश्लील चाळे; गाल ओढले, पॅन्टमध्ये हात घालून गुप्तांगाला स्पर्श केला अन्...

२४ जुलै २०२३ रोजी शालिनी यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शालिनी सध्या भाजपमध्ये कोणत्याही पदावर नाहीत. व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या शालिनी यांना त्यांचे सासरे म्हणजेच काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री श्यामलाल यादव यांनी राजकारणात आणले. गाजीपूर येथील रहिवासी असलेल्या शालिनी यादव यांचे लग्न श्यामलाल यादव यांच्या धाकट्या मुलाशी अरुणशी झाले आहे.

Shocking: भाजप महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेट, ९ तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं
Shocking : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा भीषण अपघातात मृत्यू; शरीराचे झाले दोन तुकडे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com