Shocking : मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत ९ वर्षाच्या मुलासोबत अश्लील चाळे; गाल ओढले, पॅन्टमध्ये हात घालून गुप्तांगाला स्पर्श केला अन्...

Mumbai Tardeo Crime News : मुंबईत उच्चभ्रू सोसायटीतील सिक्युरिटी गार्डने ९ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकारानंतर पालकवर्गात संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shocking : मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत ९ वर्षाच्या मुलासोबत अश्लील चाळे; गाल ओढले, पॅन्टमध्ये हात घालून गुप्तांगाला स्पर्श केला अन्...
Mumbai Crime NewsSaam tv
Published On
Summary
  • मुंबईतील ताडदेवमध्ये ९ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार

  • सिक्युरिटी गार्डने केला अत्याचार

  • गाल ओढले, पँटमध्ये हात घालून गुप्त अंगाला स्पर्श केला

  • पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आला आहे. शहरातील ताडदेव येथे एका इमारतीच्या सिक्युरिटी गार्डने एका ९ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलाला गार्डने जवळ बोलवत त्याच्या पँटीमध्ये हात टाकत गुप्त अंगाला स्पर्श केला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली असून आरोपी सिक्युरिटी गार्डवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील ताडदेव येथील एका उच्चभ्रू सोसायटीत सदर घटना घडली आहे. रविवारी दुपारी शाळांना सुट्टी असल्या कारणाने या सोसायटीतील लहान मुलं सोसायटीच्या ग्राउंडमध्ये खेळत होते. यादरम्यान या सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड एका ९ वर्षाच्या मुलाजवळ गेला. त्याचे गाल ओढले, त्याला मिठी मारली, त्याच्या पँट मध्ये हात घालून त्याच्या गुप्त अंगाला स्पर्श केला.

Shocking : मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत ९ वर्षाच्या मुलासोबत अश्लील चाळे; गाल ओढले, पॅन्टमध्ये हात घालून गुप्तांगाला स्पर्श केला अन्...
Ditwah Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठला! तापमानाचा पारा घसरला, दितवा चक्रीवादळाचा फटका राज्याला?

त्यानंतर आरोपीने मुलाला मीटर रूममध्ये नेले, तो बाहेर पडू नये म्हणून दरवाजा आतून बंद केला आणि पुन्हा मारहाण केली. शिवाय घटनेबद्दल कोणालाही सांगितले तर त्याचे पाय तोडण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलाने कसाबसा गार्डच्या तावडीतून स्वतःची सुटका करत धूम ठोकली. घरी जाऊन घडलेला सगळा प्रकार त्याने पालकांना सांगितला. संतप्त पालकांनी वीरेंद्र रामजी रायवरच्या क्रूरतेचे ताशेरे ओढले.

Shocking : मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत ९ वर्षाच्या मुलासोबत अश्लील चाळे; गाल ओढले, पॅन्टमध्ये हात घालून गुप्तांगाला स्पर्श केला अन्...
Mega Block News : महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवेर ४ दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक,लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यावरही होणार परिणाम, वाचा संपूर्ण वेळापत्रक

पीडित मुलाच्या पालकांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून आणि मुलाच्या जबाबावरून संबंधित गार्डवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १२७(२) आणि ३५१(३) आणि POCSO कायद्याच्या कलम ४, ६ आणि ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनंतर, मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले. पुढील तपास सुरू असल्याने आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com