gangrape  Saam TV News Marathi
देश विदेश

बहिणीकडे निघालेल्या मुलीला रस्त्यात गाठलं, ५ जणांनी केला सामूहिक बलात्कार, एकाचा एनकाऊंटर, ३ जणांच्या मुसक्या आवळल्या

Lucknow gangrape : उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये अकरावीच्या मुलीवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी जलद कारवाई करत ३ आरोपींना अटक केली असून एकाचा एनकाऊंटरमध्ये गोळी लागून तो जखमी झालाय.

Namdeo Kumbhar

Uttar Pradesh rape case Update : अकरावीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. उत्तर प्रेदशची राजधानी लखनौमधील ५ तरूणाच्या टोळक्यांनी मुलीवर क्रूर कृत्य केले. पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत कारवाई केली. पोलिसांनी ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. कारवाई करताना पोलीस आणि आरोपीमध्ये संघर्ष झाला. पोलिसांच्या गोळीबारात एकाचा एनकाऊंटर केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झालाय. (Uttar Pradesh Lucknow Class 11 girl gangrape case details)

मुलगी मोठ्या बहिणीकडे जात होती. त्यावेळी रस्त्यावर मित्रासोबत बोलत ती थांबली होती. त्यावेळी ५ तरूण तिथे पोहचले अन् छेडछाड सुरू केली. मुलीने आणि तिच्या मित्राने पाच जणांना विरोध केला. त्यावेळी ५ जणांनी त्या मित्राला बेदम मारहाण केली अन् हुसकावून लावले. त्यानंतर पाच आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

पाच नराधमांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर मारहाण करत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. जर कुणाला सांगितलं तर तुला जिवे मारू अशी धमकी त्या पाच नराधमांनी मुलीला दिली. मुलीने हिमंत करून आपल्यासोबत घडलेला प्रसंग भावोजीला सांगितला. पीडित मुलीच्या भावोजीने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अन् मेहुणीसोबत पोलिस स्टेशन गाठलं. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला अन् आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी तात्काळ आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना केली.

घटना झाल्यानंतर काही तासातच पोलिसांनी २ आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यानंतर रात्री बंथारामध्ये रेल्वे स्टेशनवर एक आरोपी लपल्याची टीप मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तिसऱ्या आरोपीला अटक करण्याचा प्लान रचला. पण आरोपीला ही बाब लक्षात येताच प्रतिकार कऱण्यात आला अन् पोलिसांवर हल्ला चढवला. आरोपीच्या हल्ल्याला पोलिसांकडून जोरदार प्रत्युत्तर देत गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये आरोपीला गोळी लागली असून तो जखमी झालाय. आरोपीचे नाव ललित कश्यप असे आहे. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून आणखी दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT