UP Bride Firing Video Saam TV
देश विदेश

UP Bride Firing Video : एका झटक्यात खेळ खल्लास...; नवरीने लग्न मंडपातच झाडल्या धाडधाड गोळ्या, पाहा VIRAL VIDEO

Firing Viral Video : या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ruchika Jadhav

UP Bride : प्रत्येक व्यक्ती आपल्या लग्नात फार खूश असतो. वधू आणि वर दोघेही आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात करत असतात. लग्नाच्या दिवशी सर्वचजण डीजेच्या तालावर नाचून आनंद व्यक्त करतात. अशात एका वधूने स्वत:च्या लग्नात मोठी हवा केली आहे. वधूने केलेला कारनामा पाहून नवरदेवाचाही थरकाप उडतो. (Wedding Ceremony)

दे दनादन झाडल्या गोळ्या

वधूला आपलं लग्न झाल्याचा इतका आनंद झाला की, तिने या आनंदाच्या भरात सरळ हातात एक बंदूक घेऊन हवेत गोळ्या झाडल्या आहेत. एक दोन नाही तर बंदूक रिकामी होईपर्यंत ही वधू लग्नमंडपातच गोळ्या झाडते. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील हा व्हिडिओ असल्याचे समजले आहे. हा कारनामा केल्यानंतर वधू फरार झाली आहे. येथील कोतवाली पोलीस ठाण्यात सदर घटनेविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या डॅशींग नवरीचं नाव रागिनी असं आहे. तिने गोळ्या झाडल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी नवरीविरोधात २५ (९) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमध्ये लग्नाचे सात फेरे पूर्ण करून झाल्यावर एक व्यक्ती बंदूक बाहेर काढतो. ही बंदूक वधू घेते आणि गोळ्या झाडते. त्यामुळे या प्रकरणी बंदूक देणाऱ्या व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT