Viral Video : बापरे बाप! तवा आणि विहिरीवरल्या बाबालाही टाकलं मागे; महिलेचा पाण्यावर चालतानाचा VIDEO एकदा पाहाच

Jabalpur Women : ही महिला कोणताही आधार न घेत पाण्यावर चालताना दिसत आहे.
Viral Video
Viral Video Saam TV

Jabalpur Women Walked on Water : तव्यावरचा बाबा, पाण्यावर तरंगणारा बाबा यानंतर आता पाण्यावर तरंगणाऱ्या महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. आतापर्यंत पाण्यावर चालण्याची शक्ती कोणामध्येही नव्हती. (Marathi News)

मात्र ही महिला कोणताही आधार न घेत पाण्यावर चालताना दिसत आहे. महिलेला असे पाहून अनेक जणांनी तिला नर्मदा देवीचे रुप म्हटलं आहे. अनेक व्यक्तींनी या महिलेची माहिती समजताच तिच्या भोवती दर्शनासाठी गर्दी केली आहे. (Viral Video)

Viral Video
Kajol Devgan : ब्लॅक डीप नेक वनपीसमध्ये काजोलचा किलर लूक

महिलेच्या सुरक्षेसाठी पोलिसही दाखल

सदर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ जबलपूरमधील तिलवारा घाटावरचा आहे. एक वृद्ध महिला येथील तलावाच्या पाण्यावर मध्यभागी चालताना दिसते. महिलेचा व्हिडिओ पाहून तिच्या दर्शनासाठी नागरिकांची एकच गर्दी जमा झाली आहे. या वृद्ध महिलेला पाहून नागरिकांनी हे दृष्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहेत. पाण्यातून बाहेर आल्यावर ही आजी सर्वांना आशिर्वाद देताना दिसत आहे.

महिलेचा आशिर्वाद घेण्यासाठी येथे गर्दी इतकी जास्त प्रमाणात वाढली की, पोलिसांना यासाठी महिले भोवती सुरक्षा वाढवावी लागली. सदर महिला नर्मदा देवीचे रुप असून जेव्हा ती एखाद्या आजारी व्यक्तीला औषध देते तेव्हा ती व्यक्ती लगेचच आजपणातून बरी होते, अशी चर्चा देखील गावात होताना दिसत आहे.

Viral Video
Vishnupriya Nair : जो मनात बसला तोच नवरा झाला, विष्णूप्रियाच्या प्रेमाचं लग्नात रूपांत

आता ही महिला खरोखर पाण्यावर तरंगते किंवा चालते की, ती आपल्या सर्वांची नजर चुकवून चलाखीने असे करत आहे. अशी शंका तुमच्याही मनात आली असेल. काही माध्यमांनी या महिलेशी बातचीत करत सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा, महिलेने औषधांची गोष्ट सरळसरळ नाकारली. तसेच पाण्यावर चालण्याची माझ्याकडे कोणतीही दैवी शक्ती नाही मी फक्त पायांनी चालत नर्मदा नदीची परीक्रमा पूर्ण केली आहे, असं महिलेने म्हटलं आहे.

महिला मनोरुग्ण

पाण्यावर चालणारी ही महिला ५१ वर्षांची आहे. तिचं नाव ज्योती रघुवंशी असं आहे. सदर महिला मनोरुग्ण असून गेल्या वर्षी ती गायब झाली होती. आपल्या कुटुंबाला सोडून ही महिला बरेच दिवस घरी परतली नाही. तिच्या डोक्यावर परिणाम झाला असून ती मनोरुग्ण असल्याचा दावा येथील काही गावकऱ्यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com