UP-Bihar Heatwave Saam Tv News
देश विदेश

UP-Bihar Heatwave: उष्माघाताने 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, यूपी- बिहारमधील अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट'

100 dead due to heatstroke: एकीकडे देशातील काही राज्यात तुफान पाऊस पडत आहे तर दुसरीकडे काही राज्यात ऊन्हाचा पारा वाढतच चालला आहे.

Priya More

Heatwave Update: देशातील अनेक राज्य सध्या कडक उन्हाळ्यामुळे (Summer) जनता त्रस्त झाली आहे. जून महिना सुरु होऊन 18 दिवस पूर्ण झाले तरी देखील काही राज्यात पाऊस (Rainfall) पडत नाही. एकीकडे देशातील काही राज्यात तुफान पाऊस पडत आहे तर दुसरीकडे काही राज्यात ऊन्हाचा पारा वाढतच चालला आहे.

अशामध्ये बिहार (Bihar Heatwave) आणि उत्तर प्रदेशातील (Utttar Pradesh Heatwave) जनतेला सध्या उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे लोकं आजारी पडत आहेत. धक्क्दायक म्हणजे या दोन्ही राज्यात आतापर्यंत उष्णतेमुळे 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये कडक्याचे ऊन आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर या दोन्ही राज्यांमध्ये 72 तासांमध्ये उष्माघातामुळे 60 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील एकट्या बलियामध्ये उष्णतेमुळे मृतांची संख्या 55 वर पोहोचली आहे.दररोज 125 ते 130 जण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, आंध्र प्रदेश, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणामध्ये 20 जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे या राज्यातील नागरिकांना सावध राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील बलियामध्ये उष्णतेच्या लाटेच्या उद्रेकाबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने लहान मुले,गरोदर महिला,वृद्ध आणि मजुरांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सल्ला दिला आहे.

बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे किमान 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बहुतांश ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. भोजपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे 6 जण, रोहतास, बांका आणि अरवालमध्ये प्रत्येकी 4 जण, औरंगाबादमध्ये 3 जण, नालंदा, जमुई, जेहानाबाद, भागलपूर, गया आणि पाटणा येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पुढील 24 तास उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना नेते राहुल कनाल यांना जीविताला धोका? मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून सुरक्षेची मागणी

Turmeric Bath Benefits: हळदीच्या पाण्याने आंघोळ करा, त्वचेचे इन्फेक्शन, खाज आणि मुरुम होतील कमी

Satara Accident: अंबाबाईच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, कारला ट्रकची जोरदार धडक, चौघांचा जागीच मृत्यू

MHADA Lottery : घरं घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी; म्हाडाने वाढवली अर्ज करण्याची मुदत; शेवटची तारीख काय? वाचा

Tiger Shroff : टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात नवा खुलासा; शूटर्सच्या निशाण्यावर होता सलमान खान, पण...

SCROLL FOR NEXT