Extramarital Affair: विवाहबाह्य संबंध करण्यापूर्वी करा विचार, नाहीतर गमवावी लागेल नोकरी; नियम काढणाऱ्या 'या' कंपनीची होतेय जगभरात चर्चा

Chinese Company New Rules: विवाहबाह्य संबंध असल्यास त्या कर्मचाऱ्याला थेट नोकरीवरुन काढून टाकण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
Extramarital Affair
Extramarital AffairSaam Tv

Chines Company: विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) असणाऱ्यांना चीनमधील एका कंपनीने (Chinese Company) चांगलाच झटका दिला आहे. विवाहबाह्य संबंध असल्यास त्या कर्मचाऱ्याला थेट नोकरीवरुन काढून टाकण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. या कंपनीकडून हा आश्चर्यकारक नियम लागू करण्यात आला आहे. सध्या जगभरात या कंपनीचीच चर्चा सुरु आहे.

Extramarital Affair
Pakistan Bus Accident: भीषण! ब्रेक फेल होऊन बस महामार्गावर उलटली, पाकिस्तानमध्ये अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू

चीनच्या झेजियांगमधील या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू केले आहेत. या नियमानुसार एखाद्या कर्मचाऱ्याचे विवाहबाह्य संबंध असतील तर कंपनी ते सहन करणार नाही. कंपनीने एक मेमो जारी केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, जर कर्मचार्‍यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आढळले तर त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागेल. त्याचसोबत या कर्मचाऱ्याला ही कंपनी भविष्यात पुन्हा नोकरीची संधी देणार नाही.

Extramarital Affair
Indian Student Crime News: UK मध्ये भारतीय विद्यार्थ्याचं लाजिरवाणं कृत्य; नशेत तरुणीला... घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

जिमू न्यूजच्या वृत्तानुसार, या कंपनीने दिलेला हा इशारा सर्व विवाहित कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे. कंपनीने नुकताच कर्मचारी नियमात हा आदेश पारित केला आहे. कंपनीचे व्यवस्थापन बळकट करण्यासाठी, कुटुंबाशी एकनिष्ठ राहण्यासाठी आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढावे यासाठी या कंपनीकडून हा नियम लागू करण्यात आला आहे. त्याचसोबत, कुटुंबाचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी, कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि सर्व विवाहित कर्मचार्‍यांनी दृष्ट वर्तन करु नये यासाठी कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Extramarital Affair
Husband and Wife Court Case: लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याला बायकोचं खरं रूप कळालं; कोर्टाने ७ वर्षांनी दिला निकाल

कंपनीने जारी केलेल्या या नियमांचे उल्लंघन करणार्‍या कर्मचार्‍यांना कठोर शिक्षा दिली जाणार आहे. त्याचसोबत त्यांना नोकरी गमवावी लागेल. कंपनीने कर्मचाऱ्यांना सांगितले की, 'नाही म्हणायला शिकावे लागेल, अनैतिक संबंधांना नाही म्हणा, कोणीही विवाहबाह्य संबंध ठेवू नका आणि घटस्फोट करु नका.'

या कंपनीने हे नियम तयार करण्यामागचे हेच कारण आहे की, लोकांनी त्यांचे कौटुंबिक मूल्य ओळखावे आणि त्यानुसार वागावे. कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये चांगले वागावे अशी कंपनीची इच्छा आहे. साउथ चायना पोस्टच्या (SCMP) वृत्तानुसार, सरकारी तेल कंपनीत काम करणाऱ्या विवाहित वरिष्ठ अधिकाऱ्याला एका अनोळखी महिलेचा हात धरल्याप्रकरणी कामावरुन काढून टाकण्यात आले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com