Pakistan Bus Accident: भीषण! ब्रेक फेल होऊन बस महामार्गावर उलटली, पाकिस्तानमध्ये अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू

Pakistan Bus Accident After Break Failure: या भीषण अपघातामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू तर 24 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
Pakistan Bus Accident
Pakistan Bus AccidentSaam Tv
Published On

Pakistan News: पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतात शनिवारी रात्री बसला भीषण अपघात (Pakistan Bus Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 24 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताच तपास पाकिस्तान पोलिसांकडून सुरु आहे.

Pakistan Bus Accident
Mumbai Local Train derailed : लोकलचा डबा रुळावरून घसरला; अंबरनाथजवळ अपघात; मध्य रेल्वे विस्कळीत

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात शनिवारी रात्री बसला भीषण अपघात झाला. इस्लामाबाद-लाहोर महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस (Bus overturns on highway) उलटली. बसला ब्रेक अचानक फेल (break failure) झाला आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस महामार्गावर उलटली. या अपघातामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. तर 24 पेक्षा अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Pakistan Bus Accident
Pune Fire News: आईमाता मंदिराजवळ अग्नितांडव; ३ एकर परिसरात पसरली आग

डॉनच्या रिपोर्टनुसार, ही बस इस्लामाबादहून लाहोरला जात होती. त्याचवेळी इस्लामाबाद-लाहोर महामार्गावर कल्लर कहरजवळ या बसचे ब्रेक फेल झाले. या भरधाव बसने आधी डिव्हायडरला धडक दिली. त्यानंतर ही बस महामार्गावर उलटली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग आणि मोटरवे पोलिसांनी (NHMP) घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.

Pakistan Bus Accident
Earthquake in J&K : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का; 24 तासांत सहाव्यांदा हादरला परिसर

एनएचएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. तर दोन डझनपेक्षा जास्त जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याआधी फेब्रुवारीमध्येही कल्लर कहरजवळ बस दरीत कोसळून अपघात झाला होता. या अपघातामध्ये महिला आणि लहान मुलांसह 14 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर 64 जण जखमी झाले होते. अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेले सर्वजण एका लग्नसोहळ्याला गेले होते. त्याठिकाणावरुन परत येत असताना हा अपघात झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com