Pune Fire News: आईमाता मंदिराजवळ अग्नितांडव; ३ एकर परिसरात पसरली आग

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून ११ वाहने घटनास्थळी दाखल करण्यात आली आहेत.
Pune Fire
Pune Fire Saam tv
Published On

Pune News: पुण्यातून आगीची एक मोठी घटना समोर आली आहे. कोंढव्याजवळील गंगाधाम परिसरातील आईमाता मंदिराजवळ आगीची घटना घडली आहे. येथे एका गोडाऊनला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून वाहने घटनास्थळी दाखल करण्यात आली आहेत. सध्या आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग इतकी भीषण आहे की, यामुळे धुराचे लोट हवेत दूरवर पसरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधाम सोसायटीच्या जवळ असलेल्या काकडे वस्तीत जवळपास तीन एकर परिसरात ही आग पसरली आहे. धुराचे लोट हवेत दूरपर्यंत पसरले आहेत. सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास लागलेली आग अजूनही रौद्ररूप धारण करताना पाहायला मिळतेय.

Pune Fire
#shorts : Navi Mumbai मधील पाल्मबीच रोडवर 3 वाहनांचा अपघात

जवळच सोसायटी आणि रहिवासी लोकांची गर्दी आहे. काही इमारती खाली करण्याचा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. जवळपास 20 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

ही आग इतकी भीषण आहे की, अद्यापही वाहने घटनास्थळी आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या दुर्घटनेत जवळपास 20 विविध साहित्याचे गोडाउन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. पुणे व पीएमआरडीए अशी एकून 22 अग्निशमन वाहने घटनास्थळी असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Pune Fire
Mumbai Coastal Road Status: कोस्टल रोड प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होणार; काय आहे प्रकल्पाची सद्यस्थिती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com