Mumbai Coastal Road Status: कोस्टल रोड प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होणार; काय आहे प्रकल्पाची सद्यस्थिती?

Coastal Road Details: आत्तापर्यंत या प्रकल्पाचे ७६% काम पुर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत दक्षिण मार्गाची मार्गीका वाहतुकीसाठी खुली होणार आहे.
Mumbai Coastal Road
Mumbai Coastal RoadSaamtv
Published On

सचिन गाड, प्रतिनिधी...

Mumbai Coastal Road Project : कोस्टल रोडने प्रवास करण्याचं मुंबईकरांच स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे, या प्रकल्पाचे 76 टक्के काम पूर्ण झाले असून अवघ्या काही महिन्यात कोस्टल रोडची एक मार्गीका वाहतुकीसाठी खुली केली जाईल. देशातील सगळ्यात मोठ्या टनल बोरिंग मशीन जीच नाव "मावळा" ठेवण्यात आल होते तिने अलीकडेच २.०७ लांबीच्या बोगद्याच काम पूर्ण केले आहे.

आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ही टनल नक्की असेल तरी कशी, नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण करण्यासाठी त्यात कोण कोणत्या उपाययोजना य करण्यात आल्या आहेत. काय आहे या प्रकल्पाची सध्यस्थिती, चला जाणून घेवू....

Mumbai Coastal Road
Shorts : Mumbai Coastal Raod वरील दुसऱ्या बोगद्याचं खनन काम पूर्ण!

कसा असेल मार्ग...

बहुचर्चित कोस्टल रोडची मुंबईकर मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत, मरीन ड्राईव्ह (Marin Dive) ते वांद्रे वरळी सी लिंक एवढ्या १०.५८ किलोमीटरच्या टप्प्यात समुद्रात बांधण्यात येणार पुल तसेच दोन किलोमीटर लांबीचा बोगदा हा देखील त्या कोस्टल रोडचा भाग आहे. मात्र कोस्टल रोडचं आणखीन एक वैशिष्ट्य या कोस्टल रोडसाठी बांधण्यात येणारी ७.५ किलोमीटर लांबीची सागरी तटरक्षक भिंत.

ही भिंत कोस्टल रोड बांधण्यासाठी रिक्लेम केलेल्या भूभागाच लाटांच्या तडाख्यापासून संरक्षण करेल. उलवे वरून आणलेल्या खडकांपासून ही भिंत बांधण्यात आली आहे. खडकांनी बांधण्यात आलेली ही भिंत भिंती सागरी वनस्पती तसेच सागरी जीवा यांच्या वाढीसाठी पूरक ठरणार आहे.

Mumbai Coastal Road
Breaking News: धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, छावा संघटना झाली आक्रमक, नेमकं काय आहे कारण?

७६% काम पुर्ण...

प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सीलिंक असा हा मार्ग असणार आहे. या एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाला एकूण 12,721 कोटी रुपये खर्च होणार आहेत. आत्तापर्यंत या प्रकल्पाचे ७६% काम पुर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत दक्षिण मार्गाची मार्गीका वाहतुकीसाठी खुली होणार आहे.

२.०७ किलोमीटर लांबीच्या दोन्ही बाजूकडील बोगद्यांचे खणन काम १००% पूर्ण झाले आहे. या रोडच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चार लेन तर बोगद्याच्या आत तीन लेनच्या मार्गिका असतील. या रस्त्याच्या सुरक्षेसाठीही मोठी काळजी घेण्यात आली आहे. ज्यासाठी बोगद्याला 375 मिलिमीटर जाडीचे काँक्रीटचे अस्तर लावण्यात आले आहे. तसेच आगीपासून बोगद्याचे संरक्षण करण्यासाठी अग्निरोधक फायरबोर्डही तयार करण्यात येणार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com