Breaking News: धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, छावा संघटना झाली आक्रमक, नेमकं काय आहे कारण?

मराठ्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी छावा संघनेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
Dharashiv Breaking News
Dharashiv Breaking NewsSaam tv
Published On

Dharashiv News: धाराशिवमधून मोठं वृत्त हाती आलं आहे. धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छावा संघटनेने ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आहे. मराठ्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी छावा संघनेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मराठ्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेने उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छावा संघटनेने ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आहे.

विनंती करूनही निवेदन न स्वीकारल्यामुळे छावा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Dharashiv Breaking News
Mumbai Hostel Case : राज्य सरकारची मोठी कारवाई, वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन, चंद्रकांत पाटील यांची माहिती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजा साळुंखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सांळुखे म्हणाले, 'मराठ्यांना राजकीय आणि शैक्षणिक आरक्षण मिळावे, यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेने उपमुख्यमंत्र्याचा ताफा अडवून त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला आहे. आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं आहे. अखिल भारतीय छावा संघटनेचं रितसर निवेदन न स्वीकारल्यामुळे आम्हाला हा पवित्रा स्वीकारावा लागला'.

Dharashiv Breaking News
Teacher Transfer News: शिक्षक बदलीबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा

'आमच्या मागण्या आहेत की, मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून मान्यता द्यावी. कारण हा अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांना घेऊन जाणारा समाज आहे. भारताला स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्षे झाली आहे. या मराठा समाजाची अवस्था दयनीय झाली आहे. राजकारणी लोकांनी आतापर्यंत मराठा समाजाचा वापरच केला आहे, अशी खंत सांळुखे यांनी व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com