Ashish Deshmukh News
Ashish Deshmukh NewsSaamtv

Ashish Deshmukh News: कॉंग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांचा 'भाजप'मध्ये प्रवेश! पक्षप्रवेश होताच विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

Maharashtra Political News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
Published on

Ashish Deshmukh Join BJP: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपुरात हा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी त्यांच्या आगामी वाटचालीबद्दल बोलताना विरोधकांना सुचक इशारा दिला आहे. (Maharashtra Political News)

Ashish Deshmukh News
Delhi Metro Viral Video: किती तो नटापटा! पोरीनं थेट मेट्रो ट्रेनमध्ये उघडलं पार्लर; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांची पक्ष शिस्त मोडल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कॉंग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई केली होती. तेव्हापासून त्यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यांनी अनेक भाजप नेत्यांची भेट घेतल्यानेही त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात होता.

अखेर त्यावर आज शिक्कामोर्तब झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशापुर्वी दोन दिवसांपूर्वी त्यांना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली होती...

Ashish Deshmukh News
Devendra Fadnavis News: 'जंगलात कितीही प्राणी आले, तरी वाघाची शिकार...'; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर नेम

दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर बोलताना आशिष देशमुख यांनी काकागिरी, दादागिरी आणि नानागिरी संपविल्याशिवाय राहणार नाही.. असा इशारा दिला. तसेच मी कुठल्याही पदाची मागणी केली नाही. मी कार्यकर्ता म्हणून आणि पक्ष जी जबाबदारी देईल ते करत राहणार आहे. माझी राजकीय वाटचाल कोण्या एका मतदारसंघासाठी केली नाही. विदर्भाच्या हितासाठी मी काम करणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com