Devendra Fadnavis News: 'जंगलात कितीही प्राणी आले, तरी वाघाची शिकार...'; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर नेम

विरोधकांच्या रणनीतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSaam tv
Published On

Devendra Fadnavis News: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक देखील होणार आहे. काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. याच विरोधकांच्या रणनीतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Marathi News)

नागपूरमधील माजी आमदार आशिष देशमुख हे आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे. देशमुख यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली.

Devendra Fadnavis News
Manisha kayande: मनिषा कायंदे ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाच्या वाटेवर? कसा आहे त्यांचा राजकारणातील खडतर प्रवास?

फडणवीस म्हणाले, 'देशात मोदींच्या विरोधात विरोधक एकत्र आले आहेत. आता विरोधक पाटण्यात रॅली काढणार आहे. गेल्यावेळी अशाच प्रकारे रॅली काढली होती, मात्र मंचावर असलेल्या लोकांच्या संख्येइतक्या जागा देखील मिळाल्या नाही'.

'तुम्ही तुमचा नेते कोण आहे हे सांगा. जंगलातले कितीही प्राणी आले, तरी वाघाची शिकार करू शकत नाही. आज कितीही विरोधक एकत्र आले तरी मोदींना हरवू शकत नाही, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आशिष देशमुख यांच्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, 'आशिष देशमुख यांना वेळेवर तिकीट दिली. त्यांना काकांची रणनीती माहीत असल्यामुळे विजय कसा मिळविता येईल आणि मोदींच्या नावावर कशा प्रकारे निवडून येता येईल हे त्यांनी बघितलं. अनेकदा निर्णय चुकतात, मात्र जीवनाची दिशा ठरवावी लागते. त्यांनी शिर्डीत जाऊन श्रद्धा आणि सबुरीचा धडा घेतला.

Devendra Fadnavis News
Chandrashekhar Bavankule Love Story : चंद्रशेखर बावनकुळेंची 'प्यारवाली लव्ह स्टोरी'; प्रेमविवाहानंतर कठीण काळात रिक्षाही चालवली

'पक्षात येताना मी निवडणूक लढविणार नाही हे म्हणायला धाडस लागतं. आम्हाला न सांगता देशमुख यांनी तो निर्णय घेतला. तुम्ही आता मार्ग निवडला आहे, चिंता करू नका. अनेक मोठ्या जबाबदारी तुम्हाला पार पडायच्या आहे. परिवार देखील त्यांना स्वीकारेल आणि खांद्याला खांदा लावून काम करेल, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com