Manisha kayande: मनिषा कायंदे ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाच्या वाटेवर? कसा आहे त्यांचा राजकारणातील खडतर प्रवास?

Manisha kayande: ठाकरे गटाच्या विधान परिषद सदस्या मनिषा कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
Manisha kayande
Manisha kayandeSaam tv
Published On

निवृत्ती बाबर

Manisha Kayande News: सत्तासंघर्षानंतर देखील ठाकरे गटातील नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश करणे सुरूच आहे. उद्या १९ जून रोजी ठाकरे गट षण्मुखानंद सभागृहात वर्धापन साजरा करणार आहे. त्याआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या विधान परिषद सदस्या मनिषा कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र तरीही कायंदे यांची शिंदे गटाच्या प्रवेशाच्या चर्चांवर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. (Latest Marathi News)

सूत्रांच्या माहितीनुसार, विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांचा फोन नॉट रिचेबल आहे. त्यामुळे कायंदे यांच्याकडून शिंदे गटात प्रवेश केला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. कायंदे यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला धक्का बसू शकतो. कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चेमुळे ठाकरे गटात अस्वस्थता पसरल्याचे बोलले जात आहे.

Manisha kayande
Political News : ठाकरे गटाचा आणखी एक आमदार नॉट रिचेबल; उद्धव ठाकरेंना महाशिबिराच्या दिवशीच मोठा धक्का?

कोण आहेत मनिषा कायंदे?

प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. श्यामसुंदर कायंदे आणि सुशीला कायंदे यांच्या त्या कन्या आहेत. मनिषा कायंदे यांनी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम पाहिलं आहे. 11 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. कायंदे या स्त्रियांच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवत असतात. महिलांना न्याय मिळावा म्हणून त्या अवनी या संस्थेमार्फत स्त्री शक्ती केंद्र चालवत आहेत.

भाजपमध्ये केलंय काम

लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या कायंदे यांनी भाजपमधून त्यांच्या राजकारणास सुरुवात केली. त्यांनी तब्बल 25 ते 30 वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केलं. 1997 मध्ये त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्याने त्यांचा निसटता पराभव झाला.

Manisha kayande
Chandrashekhar Bavankule Love Story : चंद्रशेखर बावनकुळेंची 'प्यारवाली लव्ह स्टोरी'; प्रेमविवाहानंतर कठीण काळात रिक्षाही चालवली

२०१२ साली शिवसेनेत प्रवेश

2009 मध्ये त्यांनी सायन कोळीवाडामधून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. 2012 मध्ये कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांना शिवसेनेचं प्रवक्तेपद मिळालं. 18 जुलै 2018 ला विधानपरिषद सदस्यपद मिळालं. शिवसेना फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली. मात्र, त्यांची आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com