निवृत्ती बाबर
Mumbai News : शिवसेनेतील बंडखोरीनंतर आज ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबीर पार पडणार आहे. मात्र या राज्यव्यापी शिबिराआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाचा आणखी एक आमदार नॅाट रिचेबल असल्याने उद्धव ठाकरेंची चिंता वाढली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांचा फोन नॉट रिचेबल आहे. त्यामुळे मनिषा कायंदे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मनिषा कायंदे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करु शकतात, असाही अंदाज वर्तवला जात आहे.
शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार आणि 12 खासदार आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधानपरिषदेचा एकही आमदार नव्हता. त्यामुळे मनिषा कायंदे यांच्या रुपाने पहिला विधानपरिषद आमदार शिंदे गटाच्या हाती लागू शकतो. अशारितीने शिंदे गटाने विधानसभेनंतर आता आपला मोर्चा विधानपरिषदेकडे वळवल्याचीही चर्चा सुरु आहे. (Political News)
शिशिर शिंदे यांचा राजीनामा
शिशिर शिंदे यांनी कालच शिवसेना ठाकरे गट उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. आपल्याला मनासारखं काम ठाकरे गटात करायला मिळत नसल्याची शिशिर शिंदे यांची खंत व्यक्त केली होती. तर आपण राजीनाम्याचे पत्र उद्धव ठाकरे यांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. पक्षात मनासारखं काम मिळत नसल्याने मी पक्षाचा उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं शिशीर शिंदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.