

सातारा जिल्ह्यातील कराडजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात
भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने चार तरुणांचा जागीच मृत्यू
या भीषण अपघातात अन्य तीन जण गंभीर जखमी झालेत
साताऱ्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. अंबाबाईच्या दर्शनावरून परत येत असताना भाविकांवर काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात कराड शहराजवळ पुणे- बंगळुरू महामार्गावर झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेले चौघेही जिवल मित्र आणि एकाच गावातील होते. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयाच उपचार सुरू आहेत. सध्या सातारा पोलिस या अपघाताच तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील कराड शहराजवळ हा अपघात झाला. पुणे- बंगळुरू महामार्गावर उड्डाणपूलावर रात्री ११ वाजताच्या सुमारास ट्रकने कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला. या अपघातामध्ये चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये मृत्यू झालेले आणि जखमी झालेले सर्वजण कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दसऱ्यानिमित्ताने दर्शनाला गेले होते. दर्शनाहून परताना हा भीषण अपघात झाला.
अपघातातील सर्व तरुण साताऱ्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे आहेत. कराड शहराजवळ उभारलेल्या नवा सहापदरी उड्डाणपूल काही दिवसापूर्वीच वाहतुकीस खुला केला असून हा या उड्डाणपुलावरील पहिलाच भीषण अपघात आहे. जखमी तरुणावर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये महामार्गावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे कातरखटाव गावावर शोककळा पसरली आहे. आपल्या मुलाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे मृत तरुणांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.