Manisha Kayande News : मनिषा कायंदे पक्ष सोडणार आम्हाला आधीपासून माहित होतं; ठाकरे गटाच्या नेत्याचा खुलासा

Political News : पुढच्या टर्मसाठीही आमदारकी मिळावी यासाठी त्यांनी गद्दारी केली आहे.
Manisha Kayande
Manisha KayandeSaam TV
Published On

निवृत्ती बाबर

Mumbai News : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे लवकरत पक्षाला सोडचिट्ठी देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरे गटाच्या राज्यव्यापी शिबिराच्या दिवशीच मनिषा कायंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र मनिषा कायंदे जाणार हे आम्हाला आधीच माहित होतं असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

विनायक राऊत यांनी म्हटलं की, मनिषा कायंदे पक्षातून बाहेर पडणार याची कल्पना आम्हाला दोन महिन्यांपासूनच होती. पुढच्या टर्मसाठीही आमदारकी मिळावी यासाठी त्यांनी गद्दारी केली आहे.

शिंदे गटाने दुसरं काही नाहीतर खरेदी-विक्रीचा बाजार सुरु केला आहे, अशी टाकीही विनायक राऊत यांनी केली. Political News)

Manisha Kayande
Chandrashekhar Bavankule Love Story : चंद्रशेखर बावनकुळेंची 'प्यारवाली लव्ह स्टोरी'; प्रेमविवाहानंतर कठीण काळात रिक्षाही चालवली

निधी महत्वाचा की निष्ठा- सचिन अहिर

विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांना त्यांच्या मागणीनुसार मोठा विकासनिधी मिळाला आहे. त्यामुळे निधी महत्वाचा की निष्ठा? असा महत्वाचा प्रश्न ठाकरे गटाचे आमदार आणि प्रवक्ते सचिन अहिर यांनी उपस्थित केला आहे. (Latest News)

Manisha Kayande
Political News : ठाकरे गटाचा आणखी एक आमदार नॉट रिचेबल; उद्धव ठाकरेंना महाशिबिराच्या दिवशीच मोठा धक्का?

कोण आहेत मनीषा कायंदे?

मनिषा कायंदे या विधानपरिषेदेच्या सदस्या आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत. 11 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. कायंदे या स्त्रियांच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवत असतात. महिलांना न्याय मिळावा म्हणून त्या अवनी या संस्थेमार्फत स्त्री शक्ती केंद्र चालवत आहेत. लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या कायंदे यांनी भाजपमधून त्यांच्या राजकारणास सुरुवात केली, तब्बल 25 ते 30 वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केलं.

1997 मध्ये त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्याने त्यांचा निसटता पराभव झाला. 2009 मध्ये त्यांनी सायन कोळीवाडामधून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. 2012 मध्ये कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014मध्ये त्यांना शिवसेनेचं प्रवक्तेपद मिळालं. 18 जुलै 2018 ला विधानपरिषद सदस्य पद मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com