Tiger Shroff : टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात नवा खुलासा; शूटर्सच्या निशाण्यावर होता सलमान खान, पण...

Tiger Shroff Firing Case Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींनी सुरुवातीला सलमान खानला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे.
Tiger Shroff Firing Case Update
Tiger Shroff SAAM TV
Published On: 

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण

टायगर श्रॉफआधी शूटर्सच्या निशाण्यावर सलमान खान होता

शूटर्सनी सलमान खानच्या घराचीही रेखी केली

साक्षी यादव, साम टीव्ही प्रतिनिधी

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेने बॉलिवूड हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन संशयित हल्लेखोरांनी सुरुवातीला सलमान खानला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहून त्यांनी तो प्लान रद्द केला. त्यानंतर, टायगर श्रॉफ जुहू येथील एका फुटबॉल मैदानावर नियमितपणे जात असल्याची आणि तिथे त्याची सुरक्षा व्यवस्था तुलनेने कमी असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी टायगरला टार्गेट केले.

सूत्रांनुसार, मुंबईत आल्यानंतर या तीन संशयित हल्लेखोरांनी सुरुवातीला अभिनेता सलमान खानला टार्गेट केले होते आणि त्याच्या घराची रेखी (पाहणी) केली होती. आरोपींना फॅन पोस्ट्स आणि इंस्टाग्राम पेजेसवरून समजले की, टायगर श्रॉफ दर रविवारी मुंबईतील जुहू परिसरातील फुटबॉल खेळायला जातो आणि तिथे त्याची सुरक्षा व्यवस्था मर्यादित असते.

२०२४ मध्ये सलमान खानच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबारानंतर, त्याची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. त्याला मुंबई पोलिसांकडून 'वाय-प्लस' (Y+) श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. त्याच्या घराबाहेर २४ तास पोलीस तैनात असतात आणि तो जिथे कुठे जातो, तिथे सशस्त्र पोलिस त्याच्यासोबत जीपमधून असतात. आता त्याच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली असून, त्याच्या अपार्टमेंटजवळ बॅरिकेड्सही लावण्यात आले आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर लगेचच, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या घटनेची जबाबदारी स्वीकारली. तसेच, त्यांनी सलमान खानसोबत काम करणाऱ्यांना पुन्हा एकदा धमकावले.

Tiger Shroff Firing Case Update
Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, आणखी एकाला अटक; हरियाणा कनेक्शन उघड

गोळीबारानंतर राजस्थानमधील कोटा पोलिसांनी हरियाणातील दोन आणि बिहारमधील एका अशा एकूण तीन शूटरना अटक केली. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याव्यतिरिक्त, हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातून आणखी चार जणांना (दोन पुरुष आणि दोन महिला) अटक करण्यात आली आहे. मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत वापरलेली शस्त्रे पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com