यूको बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा वादग्रस्त ईमेल व्हायरल झाला आहे.
अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला आईच्या निधनानंतरही रजा नाकारली.
“सर्वांची आई मरते” असं म्हणत त्यांनी सुट्टी नाकारली.
सोशल मीडियावर ईमेलचे फोटो व्हायरल होत आहेत.
यूको बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर अमानुष आणि अमानवीय वर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. चेन्नईचे यूको बँकेचे झोनल हेड आर.एस. अजित यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील ईमेलचे स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे संतापाची लाट पसरली आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये ईमेलवर झालेल्या बोलण्याचा स्क्रीनशॉर्ट सगळीकडे व्हायरल होत आहे. कर्मचाऱ्याने ईमेलमध्ये आरबीआयला टॅग केले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टवर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
एका कर्मचाऱ्याने ईमेलमध्ये चेन्नई झोनचे प्रमुख आर. एस. अजित यांच्यावर भीती आणि छळाचे वातावरण निर्माण केल्याचा आणि अधिकाऱ्यांना व्यावसायिक नसून नोकर असल्यासारखी वागणूक दिल्याचा आरोप केला. या कर्मचाऱ्याने ईमेलमध्ये अधिकाऱ्याच्या वागणुकीचे वर्णन हकुमशाही असल्याचे केले आहे. त्याचे वर्तन अनादरपूर्ण आणि असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्याने या कर्मचाऱ्याला रजा देण्यास नकार दिला तेव्हा या कर्मचाऱ्याने अनेक कर्मचाऱ्यांसोबत असंच घडलं असल्याचे सर्व पुरावे सादर केले. अधिकाऱ्याने कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीत देखील कर्मचाऱ्यांना रजा देण्यास नकार दिला असल्याचे या ईमेलमध्ये जोडलेल्या स्क्रीनशॉर्टवरून दिसून येत आहे.
ईमेलमध्ये एका प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. जिथे एका शाखाप्रमुखाची आई आयसीयूमध्ये होती आणि झोनल प्रमुखांनी अधिकाऱ्याला रजा देण्यापूर्वी तो कधी परत कामावर रुजू होणार याची खात्री करण्यास सांगितले. दुसऱ्या एका प्रकरणात जेव्हा एका शाखाप्रमुखाच्या आईचे निधन होते तेव्हा त्याने सांगितले की, 'प्रत्येकाची आई मरते. नाटक करू नको, व्यावहारिक हो. तातडीने कामावर रुजू हो. नाहीतर मी तुला रजेवर पाठवीन'.
कर्मचाऱ्याने ईमेलमध्ये पुढे असेही सांगितले की, जेव्हा एका शाखा प्रमुखाची एक वर्षाची मुलगी रुग्णालयात दाखल होती तेव्हा अधिकाऱ्याने त्याला सांगितले, 'तू डॉक्टर आहेस का? तू रुग्णालयात का आहेस? ताबडतोब ऑफिसला जा, नाहीतर मी तुला LWP म्हणून चिन्हांकित करेन.' चेन्नई झोनचे प्रमुख आर. एस. अजित यांच्या वागणुकीला सर्वच कर्माचारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे एका कर्मचाऱ्याने त्यांचे कारनामे सर्वांसमोर आणले.
दुसऱ्या एका प्रकरणात, जेव्हा एका अधिकाऱ्याच्या पत्नीला आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा अधिकाऱ्याने अपमानास्पद वक्तव्य करत सुट्टीबाबतची विनंती नाकारली. कर्मचाऱ्याने असाच अनुभव आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या ईमेलचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. त्यावर आता नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहे. एका युजरने सांगितले की, 'शिस्तीच्या नावाखाली क्रूरता सुरू आहे.' आणखी एका युजरने सांगितले की, हे नेतृत्व नाही तर क्रूर हुकूमशाही आहे. या विषारी व्यवस्थेची लाज वाटते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.