Bank Holidays: दसरा ते दिवाळी, ऑक्टोबरमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या, किती दिवस बँका राहणार बंद? वाचा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays In October 2025: ऑक्टोबर महिन्यात अनेक सण आहेत. त्यानिमित्त सरकारी सुट्ट्या असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात जवळपास २१ दिवस बँका बंद असणार आहेत. तुम्ही सुट्ट्यांची यादी वाचा.
Bank Holidays
Bank Holidays Saam Tv
Published On
Summary

ऑक्टोबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी

ऑक्टोबरमध्ये २१ दिवस बँका बंद

ऑनलाइन सुविधा राहणार सुरु

ऑक्टोबर महिना सुरु व्हायला अवघे काही दिवस उरले आहे. ऑक्टोबर महिन्यात अनेक सण आहेत. ऑक्टोबरमध्ये दिवाळी, महात्मा गांधी जयंती, दसरा आहे. यामुळे अनेक सरकारी सुट्ट्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात बँकांनादेखील अनेक दिवस सुट्ट्या असणार आहे. त्यामुळे जर तुमची बँकेत काही कामे असतील तर सुट्ट्यांची यादी नक्कीच वाचून जा.

Bank Holidays
EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच नवरात्रीची नवमी असणार आहे. अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. त्यामुळे बँकांना सुट्ट्या असणार आहे. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त देशातील सर्व बँका बंद असणार आहेत. याचसोबत इतर अनेक सण आहेत. त्यामुळे बँका बंद असणार आहे.

ऑक्टोबरमध्ये बँकांच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays In October 2025)

१ ऑक्टोबर- महानवमीनिमित्त बिहार, झारखंड, कर्नाटक,केरळ, मेघालट, नागालँड, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, पश्चिम बंगाल येथे सुट्टी असणार आहे.

२ ऑक्टोबर- गांधी जयंतीनिमित्त देशातील सर्व बँका बंद

७ ऑक्टोबर- महर्षिक वाल्मिकी जयंतीनिमित्त दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड आणि हिमाचल प्रदेशमधील बँका बंद

१७ ऑक्टोबर- करवा चौथनिमित्त पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्लीत बँकांना सुट्ट्या

२० ते २३ ऑक्टोबर- दिवाळी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, भाऊबीजनिमित्त अनेक राज्यात बँका बंद

२७-२८ ऑक्टोबर-छठ पूजानिमित्त बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, दिल्लीत बँकांना सुट्ट्या

३१ ऑक्टोबर- काली पूजानिमित्त पश्चिम बंगाल, सरदार पटेल जयंतीनिमित्त गुजरात तर दिवाळीनिमित्त दिल्लीत सुट्ट्या

Bank Holidays
Bank Jobs: सरकारी बँकेत नोकरीची सुवर्ण संधी, पगार 100,000 रुपये; अर्जाची शेवटची तारीख काय?

ऑक्टोबर महिन्यात बँका जरी बंद असल्या तरीही ऑनलाइन सेवा सुरु राहणार आहे. नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग अॅप हे सुरु असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त अडचण यायची नाही. परंतु अनेक कामे ही बँकेत जाऊनच करावी लागतात. त्यामुळे तुम्ही

Bank Holidays
Canara Bank Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कॅनरा बँकेत ३५०० पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com