
इंडियन बँकेत नोकरीची संधी
स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती सुरु
पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या
बँकेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चांगल्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. इंडियन बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन बँकेत विविध विभागात भरती केली जाणार आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठीची जाहिरात अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Indian Bank Recruitment 2025)
इंडियन बँकेतील नोकरीसाठी तुम्हाला indianbank.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२५ आहे.
इंडियन बँकेतील या भरती मोहिमेत चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजरसह अनेक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लाखो रुपये पगार मिळणार आहे. बँकेत चांगल्या मॅनेजर पदासाठी भरती करण्याची ही उत्तम संधी आहे.
इंडियन बँकेत एकूण १७१ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया कालपासून म्हणजेच २३ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२५ आहे.
इंडियन बँकेतील या नोकरीसाठी २३ ते ३६ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. ही भरती लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.
इंडियन बँकेतील नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे. स्केल II लेव्हलसाठी ६४८२० ते ९३,९६० रुपये पगार मिळणार आहे. स्केल III पदासाठी ८५९२० ते १०५२८० रुपये पगार मिळणार आहे. स्केल IV पदासाठी १०२३०० ते १२०९४० रुपये पगार मिळणार आहे.
पात्रता
इंडियन बँकेत एसओ स्पेशलिस्ट आयटी टेक्नोलॉजी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ४ वर्षांसाठी इंजिनियरिंग, कॉम्प्युटर सायन्समध्ये टेक्नोलॉजी डिग्री/ कॉम्प्यटर अॅप्लिकेशन/इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स एंड इंस्ट्रूमेंटेशन डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत इतर पदांसाठी पात्रता वेगवेगळी असणार आहे. या नोकरीबाबत अधिक माहिती तुम्हाला अधिसूचनेत देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.