Pahalgam Terror Attack Saam tv
देश विदेश

देशासोबत गद्दारी, २६ जणांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना खायला अन् राहायला दिलं, विश्वासघातकी दोघांना बेड्या

Traitors Nabbed : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मोठा खुलासा; एनआयएने दोघांना अन्न व निवाऱ्याची मदत केल्याबद्दल अटक केली आहे. या दोघांनी लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना मदत केली होती. मुख्य दहशतवादी अद्याप फरार आहेत.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Pahalgam Terror Attack News Update : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन महिन्यानंतर एनआयएला आणखी एक मोठं यश मिळाले आहे. एनआयएने जम्मू काश्मीरमधील दोघांना या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत. भारतासोबत विश्वासघात करणाऱ्या दोन नागरिकांना बेड्या ठोकल्या आहेत. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना त्यांनी राहायला जागा अन् खायला जेवण दिलं होतं. एनआयएने दोघांची कसून चौकशी केली असता तीन मोठे खुलासे झाल्याचे समोर आलेय. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता.

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी पहलगामच्या बटकोट येथील आहेत. परवेझ अहमद जोधर आणि बशीर अहमद जोथर अशी त्यांची नावे आहेत. दोघांनी देशासोबत गद्दारी केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर दहशतवाद्यांना मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या दोघांनी हल्ल्यापूर्वी आतंकवाद्यांना अन्न, निवारा आणि इतर लॉजिस्टिक सुविधा पुरवल्या होत्या, असे तपासातून समोर आले आहे. तसेच, बैसरन मैदानावर जम्मू-काश्मीर पोलिस किंवा सीआरपीएफची कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याची माहितीही त्यांनी दहशतवाद्यांना दिली होती.

चौकशीतून धक्कादायक खुलासे -

लष्कर ए तोयबाचे तीन दहशतवाद्यांना हिल पार्कमधील झोपड्यांमध्ये आश्रय दिला होता. तसेच, हल्ल्यापूर्वी त्यांना जेवण, निवास आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्याचं आरोपींनी चौकशीदरम्यान कबूल केले आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून हत्या केली. एनआयएने या दोघांना बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, १९६७ च्या कलम १९ अंतर्गत अटक केली आहे. एनआयएने सांगितले की, या दोन्ही आरोपींना लवकरच न्यायालयात हजर करून त्यांची रिमांड मागितली जाईल.

पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी फरारच

पहलगाममध्ये २६ जणांचा जीव घेणारे तीन दहशतवादी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना पकडण्यात एनआयएला यश आले आहे. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. एनआयएच्या अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, अटक करणाऱ्या आलेल्या या दोन आरोपींकडून फरार दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्यात यश मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan: इमारतीची लिफ्ट ६व्या मजल्यावरून खाली कोसळली, ८ जणांपैकी चौघे जखमी, दोघांचा पाय फ्रॅक्चर

Priya Marathe Passes Away : मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Hair dye reaction: केसांना कलर केल्यास होऊ शकते रिएक्शन; अॅलर्जी झाल्यास दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच ओळखा

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

Kumbha Rashi : आरोग्याची समस्या, पण ध्यान-प्रार्थनेत दडलेले गुपित यश, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT