Raja Raghuvanshi Case Saam Tv News
देश विदेश

Raja Raghuvanshi Case: राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात मोठा ट्विस्ट, सोनम आणि राजने दिली नात्याची कबुली; म्हणाले - 'हो आम्ही...'

Sonam Raghuvanshi: इंदुरच्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. राजाची बायको सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंड राजने रिलेशनशिपची कबुली दिली. तसंच, राजाची हत्या केल्याचे त्यांनी मान्य केले.

Priya More

लग्नानंतर हनिमूनसाठी मेघालयमध्ये गेलेल्या इंदुरच्या राजा रघुवंशीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. राजाची बायको सोनम आणि तिचा बॉयफ्रेंड राजनेच हे भयंकर कृत्य केले होते. या हत्या प्रकरणात सोनम आणि राजसह आणखी ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिस चौकशीदरम्यान सोनम आणि राजने नात्याची कबुली दिली, अशी माहिती मेघालय पोलिसांनी दिली.

राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाइंड सोनम रघुवंशी आणि तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाह यांनी आपल्या नात्याची कबुली दिली आणि राजाच्या हत्याकांडामधील आपली भूमिका स्वीकार केली. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस अधीक्षक विवेक सईम यांनी सांगितले की, सोनम आणि राज या दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आहे आणि पोलिसांसाठी क्राईम सीन रिक्रिएट केला. 'हो आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो.', असे त्यांनी पोलिस चौकशीदरम्यान सांगितले.

ईस्ट खासी हिल्स पोलिस अधीक्षक विवेक सिम यांनी मंगळवारी सांगितले की, 'राज आणि सोनम या दोघांनी रिलेशनशिपमध्ये असल्याचे मान्य केले. त्या दोघांची इच्छा होती की राजाला आयुष्यातून कायमचे काढून टाकायचे. राजा या दोघांच्या नात्यामध्ये येत होता. त्यामुळे त्यांनी राजाला संपवण्याचा कट रचला आणि त्याची हत्या केली.'

राजा कुशवाहवर सोनमचं प्रेम होते. तिला त्याच्यासोबतच राहायचे होते. पण सोनमच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न इंदुरचा व्यावसायिक राजा रघुवंशीसोबत करून दिलं होतं. यामुळे नाराज झालेल्या सोनमने आपल्या कुटुंबीयांना धमकी दिली होती की, राजाशी लग्न झाल्यानंतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. सोनमने दिलेल्या धमकीकडे तिच्या कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले. पण सोनम आणि राजचे प्रेमसंबंध राजाच्या हत्येचे मूळ कारण असल्याचे हळूहळू समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT