
उत्तर प्रदेशातील मेरठ आणि औरैया घटनेनंतर आता मुझफ्फरनगरमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या अनुज-पिंकीमध्ये वाढणारा अविश्वास आणि संशयामुळे नवविवाहित जोडप्याच्या आयुष्याची वाट लागली. पिंकीचे गुपित उघड झाल्यानंतर पिंकीने तिच्या अनुजला कॉफीमध्ये विष मिसळून ते त्याला प्यायला दिले, आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला.
अनुजची प्रकृती गंभीर
विष मिसळून दिलेली कॉफी अनुज प्यायला. कॉफी प्यायल्यानंतर अनुजची प्रकृती बिघडली आणि त्याला मेरठमधील एका रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. आता तो आपल्या जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. अनुजच्या घरच्यांनी पिंकी विराधात अनुजला मारण्याच्या उद्देशाने कॉफीमध्ये विष मिसळ्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दोन वर्षापूर्वी झाले होते लग्न
२६ वर्षीय अनुज शर्माचं दोन वर्षापूर्वी गाझियाबादमधील लोणी पोलीस स्टेशन क्षेत्रातील फरखनगर येथील पिंकी ऊर्फ सना हिच्याशी झाले होते. अनुज एका हॉस्पिटलमध्ये काम करत होता. लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच अनुज आणि पिंकीमध्ये वाद सुरू झाले. पिंकी ही सतत मोबाईलवर एका मुलाशी बोलत असे. याच कारणामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते व अनुज पिंकीला मारहान देखील करत असे. ही घटना पोलिसांपर्यंत पोहचली.
पिंकीने गाझियाबादमध्ये अनुजविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला. यानंतर, गाझियाबादमधील महिला पोलीस स्टेशनमध्ये अनुज आणि पिंकी दोघांचेही काउंसलिंग करण्यात आले. काउंसलिंगनंतर पोलिसांनी दोघांनाही एक आठवडा एकत्र राहण्यास सांगितले, त्यानंतर अनुज पिंकीला आपल्या घरी घेऊन आला, परंतु त्यानंतरही दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.
अनुजची मोठी बहीण मीनाक्षीच्या म्हणण्यानुसार, लग्नापूर्वी पिंकीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते आणि लग्नानंतर पिंकी अनेकदा त्या मुलाशी मोबाईलवर मेसेज आणि व्हिडिओ कॉलद्वारे बोलत असे, जे अनुजला आवडले नाही. माझा भाऊ अनुजने पिंकीला खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा जेव्हा माझा भाऊ कामासाठी जायचा तेव्हा पिंकी घरी एकटीच राहायची आणि त्या मुलाशी तासनतास फोनवर बोलत राहायची. एके दिवशी माझ्या भावाने पिंकीच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याने त्या मुलाशी झालेले संभाषण आणि मेसेजेस तसेच त्या मुलाचा फोटो पाहिला. ज्या मुलासोबत पिंकीचे प्रेमसंबंध होते तो दुसरा तिसरा तिसरा कोणी नसून पिंकीचा पुतण्या होता. जेव्हा अनुजने पिंकीशी या संपूर्ण प्रकरणाबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की लग्नापूर्वी तिला त्या मुलावर प्रेम होते पण लग्नानंतर असे काहीही नाही. मी त्याच्याशी फक्त फोनवर बोलते. त्या मुलावर माझे आता प्रेम किंवा त्याच्याशी माझी मैत्रीही राहिलेली नाही.
अनुजची बहीण पिंकीने आणकी आरोप केला आहे की, माझा भाऊ अनुज सर्वकाही विसरून पिंकीला घरी घेऊन आला. पण २५ तारखेच्या संध्याकाळी पिंकीने माझ्या भावाच्या कॉफीमध्ये विष मिसळले, आणि त्याला मारण्याच्या उद्देशाने ते प्यायला लावले. ज्यामुळे माझ्या भावाची प्रकृती बिघडली आणि त्याला मेरठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला आयसीयूमध्ये ठेवले आहे आणि त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे. तो काहीही बोलू शकत नाही, तो फक्त हातवारे करून संवाद साधत आहे. मेरठच्या घटनेमुळे, पिंकीने माझा भाऊ अनुजला संपवण्यासाठी एक भयानक कट रचला आहे असे मला वाटते. आम्हाला न्याय हवा आहे. मुस्कानला जी शिक्षा मिळाली, तीच शिक्षा पिंकीलाही मिळायला हवी. असं अनुजची बहिण म्हणाली आहे.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.