Crime : क्रूरतेचा कळस! चारही मुलेच, ५ हजारात मुलगी विकत घेतली अन् निर्घृण हत्या केली, हाय-पाय मोडले, अंगावर चटके दिले

Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दाम्पत्याने दत्तक घेतलेल्या मुलीचा जीव घेतला. त्यांनी त्या मुलीचा अमानूष छळ केला. हात-पाय मोडले. चटके दिले.. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला.
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime News
Published On

Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक घटना घडली आहे. चारही मुलेच असल्यामुळे ५ हजार रूपयांमध्ये मुलगी विकत घेतली. पण नराधम आई-बाबाने तिचीच निघृण हत्या केली. हात-पाय मोडले अन् तिच्या अंगावर चटके दिले. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये ही क्रूरतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. पोलिसांनी निर्दयी पती-पत्नीला अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच सिल्लोडमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

चारही मुलेच असल्याने सहा महिन्यांपूर्वी ५ हजार रुपयांमध्ये विकत घेतलेल्या चार वर्षीय चिमुकलीची पती- पत्नीने बेदम करत मारहाण जीव घेतला. चिमुकलीचे हात-पाय मोडून अंगावर चटके देत निघृण हत्या केल्याची घटना संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये घडली आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी निर्दयी पती-पत्नीला अटक केली आहे. आयात फईम शेख असे मयत चिमुकलीचे नाव आहे, तर फौजिया शेख फईम (वय २७ वर्षे) आणि शेख फईम शेख आयुब (वय ३५ वर्षे) आरोपींची नावे आहेत.

अजिंठा येथील शेख फईम शेख आयुब व फौजिया शेख फईम या दाम्पत्यास ४ मुले आहेत. मुलगी नसल्याने त्यांनी सहा महिन्यांपूर्वी चार वर्षीय आयातला जालना येथून शेख नसीम अब्दुल कायुम यांच्याकडून ५ हजार रुपयांमध्ये बॉण्ड पेपरवर व्यवहार करून विकत घेतले होते. मजुरी करणारे हे कुटुंब १५ दिवसांपूर्वी सिल्लोड येथील मुगलपुरा भागात राहायला आले होते. फौजिया हिला आयातला दत्तक घेणे आवडले नसल्याने तिचा पतीसोबत नेहमी वाद होत होता.

सिल्लोड येथे आल्यापासून या दाम्पत्याने तिचा अमानुष छळ सुरू केला. तिला उपाशी ठेवले. बुधवारी रात्रीही जळत्या लाकडाने तिच्या पूर्ण अंगावर चटके दिले. तिचे हात व तळ पाय सांध्यातून मोडले. त्यानंतर तिच्या डोक्यात व पाठीत कशाने तरी जोराने मारून तिला गंभीर जखमी केले. वेदनेत असलेल्या चिमुकलीची अखेर बुधवारी मध्यरात्री ३ वाजता श्वास सोडला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मध्यरात्रीच तिचा सिल्लोड येथील एका कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या लोकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी दफनविधी रोखला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com