Raja Raghuvanshi Case : राजा रघुवंशीच्या हत्येपूर्वीचा ट्रेकिंगचा नवीन VIDEO समोर, सोनम पुढे तर राजा मागे अन्...

Raja Raghuvanshi Murder Last Video : व्हिडिओमध्ये सोनम पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. तिच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी आहे, ज्यात रेनकोट असावा. या ट्रेकवेळीच सोनमचे तीन साथीदार त्यांचा पाठलाग करत होते.
Raja Raghuvanshi Murder Last Video
Raja Raghuvanshi Murder Last VideoSaam Tv News
Published On

इंदूर : इंदूरचे व्यावसायिक राजा रघुवंशी याच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. हत्येपूर्वीचा एक महत्त्वाचा व्हिडिओ समोर आला आहे. २३ मे रोजी सकाळी ९.४५ वाजता मेघालयातील डबल डेकर ब्रिज परिसरात राजा आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी ट्रेकिंग करताना दिसतात. एका पर्यटकाने चुकून काढलेल्या व्हिडिओमध्ये सोनम पुढे-पुढे चालताना आणि राजा तिच्या मागे चालताना दिसत आहे. काही तासांनंतर याच ट्रेक दरम्यान निर्जन ठिकाणी तीन सुपारी किलर्सनी राजाची हत्या केली. व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर एम.देवसिंह नावाच्या पर्यटकानं पोस्ट केला आहे. त्याने लिहिलं आहे की, 'मी २३ मे २०२५ रोजी मेघालयात ट्रेकिंगसाठी गेलो होतो. काल मी तो व्हिडिओ पाहताना लक्षात आलं की, त्या दिवशी सकाळी ९.४५ वाजता एक जोडपं ट्रेक करताना माझ्या कॅमेऱ्यात कैद झालं. नंतर समजलं की हेच इंदूरचे राजा आणि सोनम रघुवंशी होते.'

व्हिडिओमध्ये सोनम पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. तिच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी आहे, ज्यात रेनकोट असावा. या ट्रेकवेळीच सोनमचे तीन साथीदार त्यांचा पाठलाग करत होते. हे तिन्ही आकाश राजपूत, विशाल चौहान आणि आनंद कुर्मी हे सुपारी किलर असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. मेघालय पोलिसांनी या प्रकरणात मुख्य सूत्रधार सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह, तसेच इतर तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तपासानुसार, सोनम आणि राज कुशवाहने मिळून लग्नाआधीच राजाची हत्या करण्याचा कट रचला होता.

Raja Raghuvanshi Murder Last Video
Rapido Bike Driver : बाईक इतकी फास्ट का चालतोयस? महिला प्रवाशाच्या प्रश्नांमुळे रॅपिडोचालकाचा संताप, जोरात कानशिलात लगावली अन्...

११ मे रोजी सोनम आणि राजा रघुवंशी यांचा विवाह झाला आणि २० मे रोजी दोघे हनीमूनसाठी मेघालयात गेले. २३ मे रोजी दोघेही अचानक बेपत्ता झाले. २ जून रोजी राजाचा मृतदेह खोल खाईतून सापडला आणि अखेर ९ जूनला सोनमने गाझीपूरमध्ये आत्मसमर्पण केलं . हा व्हिडिओ या हत्याकांडात एक महत्त्वाचा पुरावा ठरणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं असून, अधिक तपास सुरू आहे.

Raja Raghuvanshi Murder Last Video
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताचे गूढ उलगडणार, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com