
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता राजा रघुवंशीचा भाऊ सचिनने खळबळजनक दावा केला आहे. माझ्या भावाचा नरबळी देण्यात आला आहे. सोनमने तिच्या वडिलांची तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी राजाचा नरबळी दिला आहे, असा दावा सचिन रघुवंशीने दिला आहे.
सचिन रघुवंशीच्या दाव्याने राजाच्या हत्या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. सचिन रघुवंशीने म्हटलं की,'माझ्या भावाचा नरबळी देण्यात आलाय. सोनमने तिच्या वडिलांसाठी माझ्या भावाचा नरबळी दिला आहे. तिच्या वडिलांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. आता त्यांची तब्येत सुधारली आहे. तिने ६० वर्षांच्या वृद्धासाठी माझ्या भावाचा नरबळी का दिला?'.
सोनमचे कुटुंबीय मांत्रिकाच्या संपर्कात होते. सचिनच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. सध्या सोनमच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. राजाचा मोठा भाऊ सचिन रघुवंशीने पुढे म्हटलं की, 'सोनमच्या वडिलांनी मुलीचा फोटो उलटा टांगून जिवंत परत येण्यासाठी जादूटोणा केला आहे. त्यांनी जावयासाठी मुळीच काही केलं नाही. सोनमच्या कुटुंबीयांनी जावई राजाचा फोटो उलटा टांगला असता तर तो जिवंत घरी आला असता'.
सोनमचे आई आणि वडील देखील या प्रकरणात सामील आहेत. त्यांनी त्यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी सचिन रघुवंशीने केली आहे. सचिन रघुवंशीने सांगितलं की, 'सोनमच्या कुटुंबाला मांत्रिकाचा सल्ला देणारा कोण होता. यामागे हत्येचं षडयंत्र रचण्यात आल्याचा संशय वाटत आहे'. पोलिसांनी मांत्रिक कनेक्शननेही तपास करावा, अशी मागणी सचिन रघुवंशीने केला आहे. सचिनने सोनमच्या आईवरही टीका केली. 'आईला मुलीच्या प्रेम प्रकरण आणि षडयंत्राची संपूर्ण माहिती होती. आईला कोणीच लपवत नाही'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.