Shocking : प्रसिद्ध मॉडेलची हत्या; कालव्यात आढळला मृतदेह, मनोरंजनसृष्टीत खळबळ

haryana shocking : हरियाणामध्ये प्रसिद्ध मॉडेलची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या मॉडेलचा कालव्यात मृतदेह आढळला. या घटनेने मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे.
haryana shocking
ShockingSaam tv
Published On

Haryana Crime News : मनोरंजनसृष्टीला हादरवणारी घटना हरियाणामध्ये घडली आहे. हरियाणातील म्यूझिक इंडस्ट्रीतील मॉडेल शीतल उर्फ सिम्मी चौधरीची हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी गळा दाबून शीतलची हत्या केली आहे. शीतलचा एका कालव्यात मृतदेह आढळल्यानंतर धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

haryana shocking
Navi Mumbai Shocking : प्रसिद्ध IT कंपनीमध्ये जॉबला, नैराश्यात नवी मुंबईतल्या नंदिनीचं टोकाचं पाऊल; पोलिसांना चिठ्ठी सापडली अन्...

शीतलच्या हात आणि छातीवर टॅटूमुळे मृतदेहाची ओळख झाली. शीतल पानीपत येथे राहत होती. पोलिसांनी शीतलचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोस्टमार्टमसाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाने हरियाणात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकारी प्रेम सिंह यांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. प्रेम प्रकरणातून मॉडेल शीतलची हत्या करण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

haryana shocking
Shocking : ऑनलाइन जुगारामुळे कर्जबाजारी झाला, २ वर्षांच्या मुलासह बायकोला विष दिलं, मग स्वत: टोकाचे पाऊल उचललं

मीडिया रिपोर्टनुसार, शीतल ही १४ जूनपासून बेपत्ता होती. शीतलची बहीण नेहाने पानीपत येथील उरलाना कला पोलीस चौकीत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. नेहाने पोलीस तक्रार देताना सांगितलं की, 'शीतलने १४ जून रोजी शूटिंगसाठी बाहेर जात असल्याचे सांगितलं होतं. परंतु शूटिंगसाठी गेलेली शीतल पुन्हा घरी परतलीच नाही. त्यामुळे पोलिसांत तक्रार दिली'. तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोधमोहित सुरु केली. त्यावेळी दिल्लीतील एका कालव्यात कार बुडाल्याची माहिती मिळाली.

haryana shocking
Pune Bridge Collapse : ...तरी पर्यटकांनी ऐकलं नाही; मावळच्या कुंडमळा दुर्घटनेवर पुण्याचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?

या कारमध्ये असणाऱ्या तरुणाला लोकांनी वाचवलं होतं. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने कार कालव्यातून बाहेर काढली. शीतलच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, 'लोकांनी वाचवलेला तरुण हा शीतलचा बॉयफ्रेंड आहे. त्यानेच शीतलची हत्या केल्याचा संशय आहे. अपघाताचा बनाव रचण्यासाठी कार कालव्यात पाडली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांना शीतलच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत. पोलीस आता शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com